हॅरी ब्रुकने सेहवागचा विक्रम मोडला; बनला ‘मुलतान’चा नवा ‘सुलतान’!

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानच्या दौऱ्यावर असणाऱ्या इंग्लंडच्या खेळाडूंनी कसोटीत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. मुलतान येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा युवा फलंदाज हॅरी ब्रुकने त्रिशतक झळकावून  ऐतिहासिक कामगिरी केली. यासह ‘मुलतान’चा ‘सुलतान’ बनला आहे. त्याने हे त्रिशतक ९८.४५ च्या सरासरीने फलंदाजी करत ३१० चेंडूत झळकावले. ब्रुकचे हे त्रिशतक हे कोणत्याही इंग्लिश फलंदाजाने झळकवलेले सर्वात जलद त्रिशतक ठरले आहे. यासह ब्रूक कसोटी क्रिकेटमध्ये वेगवान त्रिशतक झळकावणारा गेल्या ३४ वर्षांतील पहिला इंग्लिश खेळाडू ठरला आहे. त्याचे हे कारकिर्दीतील पहिलेच त्रिशतक आहे. ही कामगिरी करताना हॅरी ब्रुकने वीरेंद्र सेहवागचा मुलतान स्टेडियमवरील त्रिशतकाचा  विक्रम मोडीत काढला. (Harry Brook)

ब्रुकने मोडला विरेंद्र सेहवागचा मुलतानमधील विक्रम

२००४ साली पाकिस्तान दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियाने मुलतानमध्ये झालेल्या पाकिस्तानविरूद्ध  सामन्यात विरेंद्र सेहवागने धुवाधार खेळी करत त्रिशतक झळकावले होते. त्या सामन्यात सेहवागने टीम इंडियासाठी ३६४ चेंडूमध्ये ३०९ धावांची खेळी  केली होती. या खेळी दरम्यान त्याने ३९ चौकार आणि ६ षटकार झळकावले होते. पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात हॅरी ब्रुकने फलंदाजी करताना ३१० चेंडूमध्ये त्रिशतक झळकावून मुलतानच्या मैदानावर सर्वाधिक धावसंख्या करणारा खेळाडू बनला आहे. या खेळीत त्याने २९ चौकार आणि ३ षटकारांच्या सहाय्याने ३१७ धावा केल्या. याआधी विरेंद्र सेहवागने मुलतानच्या मैदानावर ३०९ धावांची खेळी केली होती.

जलद त्रिशतक ठोकण्याचा विक्रम सेहवागच्याचं नावावर

सर्वात जलद त्रिशतक झळकावण्याच्या बाबतीत सेहवाग अजूनही अव्वल स्थानी आहे. त्याने २००७-०८ साली झालेल्या द. आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात केवळ २७८ चेंडूत त्रिशतक झळकावण्याची कामगिरी केली होती. (Harry Brook)

पाकिस्तानविरूद्ध त्रिशतक झळकवणारा पाचवा फलंदाज

हॅरी ब्रुक पाकिस्तानविरूद्ध त्रिशतक झळकवणारा पाचवा फलंदाज बनला आहे. ब्रुकच्या आधी वेस्ट इंडिजच्या गॅरी सोबर्स यांनी १९५८ साली ३६५ धावांची नाबाद खेळी केली होती. १९९८ साली ऑस्ट्रेलियाच्या मार्क टेलरने पेशावर कसोटीत नाबाद ३२४ धावा केल्या होत्या. तर २००४ साली भारताच्या वीरेंद्र सेहवागने मुलतानच्या मैदानात ३०९ धावांची खेळी केली होती. यानंतर २०१९ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरने ३३५ धावांची नाबाद खेळी केली होती.

कसोटीत त्रिशतक झळकावणारा सहावा खेळाडू

ब्रुकला पाकिस्तानमध्ये धावा करायला आवडते. मागील दौऱ्यात त्याने पाकिस्तानी भूमीवर ४६८ धावा लुटल्या होत्या. या दौऱ्यात त्याने आपला धमाकेदार फॉर्म कायम ठेवत पाकिस्तानच्या मैदानावर वादळी खेळी केली आहे. मालिकेतील पहिल्याच कसोटीत त्याने ३१७ धावांची खेळी करून त्याने आपला झंझावात दाखवला आहे. पाकिस्तानच्या सपाट खेळपट्ट्यांचा फायदा कसा घ्यायचा हे त्याला चांगलत समजलं आहे. यासह कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणारा तो सहावा इंग्लिश खेळाडू ठरला आहे.   (Harry Brook)

रूटसोबत ऐतिहासिक भागीदारी

ब्रूक आणि जो रूट यांनी मिळून ४५४ धावांची भागीदारी केली. कोणत्याही कसोटीत पाकिस्तानविरुद्ध केलेली ही सर्वात मोठी भागीदारी आहे. या जोडीने पीटर मे आणि कॉलिन काउड्री यांचा 67 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. याआधी त्यांनी ४११ धावांची भागीदारी केली होती. या भागिदारी मोलाची साथ देणारा  रुट २६२ धावांची उत्कृष्ट खेळी खेळून बाद झाला. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील सहावे द्विशतक झळकावले.

हेही वाचा :

Related posts

Modi Letter : ‘तुझी निवृत्ती जणू कॅरम बॉल’

England Cricket : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर!

‌Team India Practice : रोहित, आकाशदीपला किरकोळ दुखापत