नवी दिल्ली; वृत्तसंस्था : दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानावर भाजपने पुन्हा एकदा हल्ला केला आहे. प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी पत्रकार परिषद घेतली आणि केजरीवाल यांच्या घरात सोन्याचा मुलामा असलेल्या टॉयलेट सीट आणि वॉश बेसिनचे फोटो शेअर केले.
सचदेवा म्हणाले की, दिल्लीतील जनता त्याचा हिशोब मागणार आहे. भाजप उद्यापासून आंदोलन करणार आहे. हा पैसा हलाल नसून दलालाचा आहे. दिल्लीतील जनतेचा विश्वासघात करून कमावलेला हा पैसा आहे. त्यांनी ऐषाआरामावर खर्च केला. दिल्लीतील जनता त्याचा हिशेब मागत आहे. या काळ्या पैशाचा हिशेब भाजपचे कार्यकर्ते मागणार आहेत. उद्यापासून भाजप केजरीवाल यांच्या घराला घेराव घालणार आहे.
दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजेंद्र गुप्ता यांनीही मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावरील खर्चाबाबत केजरीवाल यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करत याप्रकरणी प्रश्न विचारला आहे. त्यांनी ट्विटरवर लिहिले, की केजरीवाल यांच्या शीश महलवर नवे खुलासे! सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कागदपत्रांवरून असे दिसून येते, की एप्रिल २०२२ नंतर तेथे कोणतेही काम झाले नाही. मग ‘शीशमहाला’मध्ये नंतर बसवलेल्या अगणित सुविधा कुठून आल्या? सर्वात धक्कादायक: सोन्याचा मुलामा असलेला कमोड आणि बेसिन! ‘शीशमहल’ रिकामा करताना केजरीवाल यांनी ते सोबत घेतले.
केजरीवाल यांच्या शीश महलवर एप्रिल २०२२ नंतर कोणतेही काम झाले नसल्याचे सार्वजनिक बांधकाम कागदपत्रांवरून समोर आले आहे. २०२४ पर्यंत करोडो रुपयांचा महागडा माल त्यात आलाच कसा?