‘लोकशाही दौड’मध्ये पाच हजारांचा सहभाग

कोल्हापूर : प्रतिनिधी : मतदार जनजागृतीसाठी शनिवारी आयोजित केलेल्या ‘लोकशाही दौड’ला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सुमारे पाच हजारांहून अधिक नागरिक आणि धावपटूंनी यामध्ये सहभाग नोंदवला. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला.

कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे संजय शेटे यांनी दिलेल्या ‘चला मतदान करुया,’ या जनजागृतीपर स्टिकर्सचे अनावरण यावेळी झाले. उपस्थित सर्वांना मतदान प्रतिज्ञाही देण्यात आली.

आजवरच्या सर्व निवडणुकांमध्ये मतदानात अग्रेसर राहून कोल्हापूर जिल्हा सजग असल्याचे जिल्हावासियांनी दाखवून दिले आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावे. जिल्ह्याची आजवरची मतदानाची परंपरा कायम ठेवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी येडगे यांनी केले. त्यांनी दौडमध्ये सहभागी धावपटूंसोबत १० किलोमीटर अंतर पार केले.

यावेळी निवडणूक सामान्य निरीक्षक मीर तारीक अली, विश्व मोहन शर्मा, निवडणूक निरीक्षक (पोलीस) अर्णव घोष, कोल्हापूर महापालिका आयुक्त तथा स्वीप नोडल अधिकारी डॉ. के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीपचे नोडल अधिकारी एस कार्तिकेयन, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, उप जिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे, निवडणूक निर्णय अधिकारी कोल्हापूर उत्तर डॉ. संपत खिलारी, जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे आदी उपस्थित होते. मीर तारीक अली, विश्व मोहन शर्मा, अर्णव घोष, डॉ. के. मंजूलक्ष्मी, कार्तिकेयन, महेंद्र पंडित यांनीही ३ किमी चालत जनजागृती केली

Related posts

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली

सोशल मीडियावर लाईव्ह करत तरुणाची पंचगंगेत उडी