पाकिस्तानविरूद्धच्या दुसऱ्या सामन्यासाठी इंग्लंडचा संघ जाहीर

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : इंग्लंडचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात तीन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. यातील पहिल्या सामन्यात इंग्लंडने एक डाव आणि ४७ धावांनी पराभूत करून मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा कसोटी सामना मुलतानच्याच मैदानावर होणार आहे. या सामन्यासाठी इंग्लंडने आपली प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. दुसऱ्या कसोटीसाठी नियमित कर्णधार बेन स्टोक्सने संघात पुनरागमन केले आहे. दुखापतीमुळे तो पहिला कसोटी सामना खेळू शकला नव्हता. तसेच मॅथ्यू पॉट्स यालाही संघात स्थान मिळाले आहे. (ENG vs PAK)

‘हे’ दोन खेळाडूवर बेंचवर

पाकिस्तानविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात बेन स्टोक्स आणि मॅथ्यू पॉट्स यांनी संघात पुनरागमन केले आहे. यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून गस ॲटकिन्सन आणि ख्रिस वोक्स यांना वगळण्यात आले आहे. मुलतान कसोटीत ॲटकिन्सन आणि वोक्स यांनी शानदार कामगिरी करत अनुक्रमे 39 आणि 35 षटके टाकली होती. (ENG vs PAK)

दुसऱ्या कसोटीसाठी पाकिस्तान संघात धक्कादायक बदल

गेल्या काही काळापासून पाकिस्तानी संघ सुमार कामगिरी करत आहे. संघाचा कर्णधार शान मसूदच्या नेतृत्वात पाकिस्तानी संघाला सलग ६ कसोटी सामन्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. या कारणामुळे पाकिस्तानने बाबर आझम, शाहीन आफ्रिदी आणि नसीम शाह या खेळाडूंना दुसऱ्या कसोटीसाठी बेंचवर बसवले आहे. त्यांच्या जागी देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत असलेल्या खेळाडूंना संधी दिली आहे.

दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइंग 11 :

जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (विकेटकीपर), ब्रायडन कार्स, मॅट पॉट्स, जॅक लीच, शोएब बशीर.

 

हेही वाचा :

Related posts

Modi Letter : ‘तुझी निवृत्ती जणू कॅरम बॉल’

England Cricket : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर!

‌Team India Practice : रोहित, आकाशदीपला किरकोळ दुखापत