England Cricket : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर!

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : इंग्लंड क्रिकेट बोर्डने चॅम्पियन्स ट्रॉफीसह भारत दौऱ्यासाठी आपला संघ जाहीर केला आहे. भारताविरूद्ध मालिकेत वन-डे आणि टी-२० मालिका खेळणार आहे. इंग्लंड क्रिकेटने आपल्या संघाची धुरा जोस बटलरकडे संघाची धुरा दिली आहे. तर मुख्य प्रशिक्षक पदाची जबाबदारी ब्रॅडन मॅक्युलमकडे आहे. इंग्लंडने बेन स्टोक्सला वगळले आहे तर, जो रूटने वन-डे किक्रेटमध्ये पुनरागमन केले आहे.

पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी आधी इंग्लंड भारताविरूद्ध पाच टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेला २२ जानेवारीपासून सुरूवात होणार आहे. मालिकेतील पहिला सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर खेळवण्यात येणार आहे. यानंतर तीन वन-डे सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेला ६ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. (England Cricket)

जो रूटचे वन-डे संघात पुनरागमन

जो रूटने वनडे संघात पुनरागमन केले आहे. तर बेन स्टोक्सला संघातून वगळण्यात आले आहे. या महिन्याच्या सुरुवातीला न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीदरम्यान त्याला डाव्या हाताला दुखापत झाली होती. (England Cricket)

भारताचा इंग्लंड दौरा

पहिला टी-२० सामना : २२ जानेवारी
दुसरा टी-२० सामना : २५ जानेवारी
तिसरा टी-२० सामना : २८ जानेवारी
चौथा टी-२० सामना : ३१ जानेवारी
पाचवा टी-२० सामना : २ फेब्रुवारी

वन-डे मालिका

पहिला वनडे सामना : ६ फेब्रुवारी
दुसरा वनडे सामना : ९ फेब्रुवारी
तिसरा वनडे सामना : १२ फेब्रुवारी

चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वन-डे मालिकेसाठी इंग्लंडचा संघ :

जोस बटलर (कर्णधार), जोफ्रा आर्चर, गस ऍटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, जो रूट, साकिब महमूद, फिल सॉल्ट आणि मार्क वुड.

टी-२० मालिकेसाठी संघ :

जोस बटलर (कर्णधार), रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, गस ऍटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, साकिब महमूद, फिल सॉल्ट आणि मार्क वुड.

हेही वाचा :

Related posts

Modi Letter : ‘तुझी निवृत्ती जणू कॅरम बॉल’

‌Team India Practice : रोहित, आकाशदीपला किरकोळ दुखापत

Asia Cup U-19 : भारताच्या मुलींना विजेतेपद