Dewas Crime : नऊ महिने फ्रीजमध्ये होता मृतदेह

Dewas Crime

देवास : मध्यप्रदेश : वीज पुरवठा खंडीत झाल्यावर एका घरातून दुर्गंधी सुटली. घरमालक आणि शेजाऱ्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केल्यावर फ्रीजमध्ये मृतदेह आढळला. लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्या महिलेचा एकाने खून करुन नऊ महिन्यांपूर्वी मृतदेह फ्रीजमध्ये ठेवल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. (Dewas Crime)

इंदोर शहरात ही घटना घडली. पोलीस अधीक्षक पुनीत गहलोत यांनी याची माहिती दिली. ज्या घरात हा मृतदेह मिळाला त्या घरात संजय पाटीदार भाडेकरु होता. गेली पाच वर्षे तो प्रतिभा उर्फ पिंकी प्रजापती सोबत ‘लिव्ह इन रिलेशनशीप’मध्ये होता. प्रतिभाने संजयकडे विवाहासाठी तगादा लावला. प्रतिभाच्या त्रासाला कंटाळून संजयने सहकारी विनोद दवेच्या मदतीने प्रतिभाने काटा काढण्याचा कट रचला. मार्च २०२४ मध्ये प्रतिभाचा गळा दाबून खून केला. खून करुन तिचा मृतदेह फ्रीजमध्ये ठेवला. पोलिसांनी सांगितले की, संजय विवाहित होता. तो आणि त्याचा मित्र विनोद दवे उज्जैनचे रहिवासी आहेत. संजय हा शेती संबधित काम करत होता. विनोद दवे हा अन्य एका गुन्ह्यात आरोपी असून तो सध्या राजस्थानच्या कारागृहात आहे.(Dewas Crime)

वीज पुरवठा खंडीत झाला आणि दुर्गंधी सुटली

रात्रीच्यावेळी अचानक वीज पुरवठा खंडीत झाला आणि १२८ क्रमांकाच्या घरातून दुर्गंधी सुटली. दुर्गंधी सुटल्यानंतर शेजारी बलवीर सिंह यांनी घरमालकासह बँक नोट प्रेस पोलिस ठाण्याशी संपर्क साधून दुर्गंधीची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर महिलेचा मृतदेह आढळून आला.भाडेकरू संजय पाटीदार सहा महिन्यांपूर्वीच घर सोडून गेला होता.(Dewas Crime)

हेही वाचा : 

पत्नीला तो करायला लावी…

Related posts

ACB Raid : लाच घेताना दोघांना अटक

Los Angeles Fire : उरले केवळ भग्नावशेष!

Virat, Anushka : विराट, अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या भेटीस