आयसीसी वन-डे क्रमवारीत दीप्ती शर्माची दुसऱ्या स्थानावर झेप

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : आयसीसीने आज (दि.२९) जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत भारतीय महिला संघाची फिरकीपटू दीप्ती शर्माने दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. न्यूझीलंडविरूद्धच्या तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेतील शानदार कामगिरीचा तिला फायदा झाला आहे. या यादीत इंग्लंड महिला संघाची खेळाडू सोफी एक्लेस्टोन ७७० गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. न्यूझीलंडविरूद्ध सुरू असलेल्या वन-डे मालिकेत दीप्तीने शानदार कामगिरी केली. सामन्यात तिने ३.४२ च्या इकॉनॉमी रेटन गोलंदाजी करत दोन विकेट घेतल्या आहेत. (Deepti Sharma)

आयसीसी क्रमवारीत दीप्ती पहिल्यांदाच या स्थानी

दीप्तीने नुकत्याच झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेक धडाकेबाज कामगिरी केली होती. न्यूझीलंडविरूद्घच्या मालिकेत दीप्तीने आपली धडाकेबाज खेळी सुरू ठेवली आहे. या खेळीचा फायदा तिला आयसीसी क्रमवारीत झाला आहे. दीप्ती आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत प्रथमच आयसीसी वनडे क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे.

क्रमवारीत स्मृती मानधनाचे नुकसान

आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत भारताची स्टार फलंदाज स्मती मानधनाचे नुकसान झाले आहे. यादीत तिची एका स्थानाने घसरण झाली आहे. ताज्या यादीत स्मृती ७०५ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. (Deepti Sharma)

हेही वाचा :

Related posts

Indian women’s win : भारताचा मोठा विजय

Modi Letter : ‘तुझी निवृत्ती जणू कॅरम बॉल’

England Cricket : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर!