Dead Body in Plane : विमानाम दोन मृतदेह आले कसे?

Dead Body in Plane

फोर्ट लॉडरडेल : हॉलीवूड आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलेल्या जेट ब्लू विमानाच्या चाकांच्या पोकळीत दोन मृतदेह आढळले. हे विमान न्यूयॉर्क शहरातून आले होते, असे एअरलाइनने सांगितले. या घटनेमुळे एअरलाइन्सच्या सुरक्षेबद्दल चिंता निर्माण झाली आहे. (Dead Body in Plane)

विमानाचे लँडिंग झाल्यानंतर कर्मचारी सोमवारी रात्री विमानाची देखभाल आणि तपासणी करत होते. त्या दरम्यान हे मृतदेह सापडले. त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. शिवाय ते विमानात आले कसे, यासंदर्भात तपास सुरू आहे.

जेट ब्लूने स्पष्ट केल्यानुसार, फ्लाइट १८०१ हे विमान नुकतेच न्यूयॉर्कमधील जॉन. एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून रात्री ११:१० वाजता फोर्ट लॉडरडेलमध्ये उतरले.(Dead Body in Plane)

‘लँडिंग गीअर क्षेत्रातील एका गेट टेक्निशियनच्या या दोघांचे मृतदेह असल्याचे लक्षात आले. मृत्यू झालेले दोघेही पुरुष आहेत,’ ब्रॉवर्ड काउंटी शेरीफ कार्यालयाचे प्रवक्ते कॅरी कॉड म्हणाले.  या दोघांच्या मृत्यूची कारणे शोधण्यासाठी ब्रोवार्ड काउंटी वैद्यकीय परीक्षक कार्यालय शवविच्छेदन करेल, असेही कॉड यांनी स्पष्ट केले.(Dead Body in Plane)

दोन्ही मृतदेह कुजले होते. ब्रॉवर्ड काउंटी एव्हिएशन विभागाचे प्रवक्ते आर्लेन सॅचेल यांनी सीएनएनला सांगितले की, तपासणीचा विमानतळावरील कामकाजावर परिणाम होणार नाही. या फ्लाइटवर आलेले प्रवासी आधीच उतरले होते, असे सॅचेल यांनी स्पष्ट केले.

‘विमानात घडलेली ही घटना हृदयद्रावक आहे. हे कसे घडले त्यासंबंधीचा तपास सुरू आहे. तपास अधिकाऱ्यांना आम्ही पूर्ण सहकार्य करू, गरज पडली तर त्यांच्यासोबतही काम करण्याची आमची तयारी आहे,’असे जेट ब्लू यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

. . . .

Related posts

Vehicle thieves Racket : महाराष्ट्रातून चोरायची; कर्नाटकात विकायची

elephant-turns-violent हत्तीने सोंडेने गरगरा फिरवले आणि फेकले

Couple Suicide : लग्नाच्या वाढदिवसाचा केप कापला, आणि…