Home » Blog » Contractual recruitment in ST : एसटीमध्ये कंत्राटी पद्धतीने १७ हजार ४५० चालकांची भरती

Contractual recruitment in ST : एसटीमध्ये कंत्राटी पद्धतीने १७ हजार ४५० चालकांची भरती

by प्रतिनिधी
0 comments
Contractual recruitment in ST

मुंबई : प्रतिनिधी : एसटी मध्ये १७ हजार ४५० चालक व सहाय्यक पदासाठी भरती करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली. येत्या दोन ऑक्टोबर रोजी दसरा आणि गांधी जयंतीचे औचित्य साधून दोन ऑक्टोबरपासून निविदा प्रक्रिया सुरू होणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. (Contractual recruitment in ST)

एसटी महामंडळ आगामी काळात नवीन आठ हजार बसेस रस्त्यांवर आणणार असून त्यासाठी मनुष्यबळाची अत्यंत गरज असल्याने कंत्री पद्धतीने चालक आणि सहाय्यक पदासाठी भरती होणार आहे. यामुळे हजारो बेरोजगार तरुण तरुणींना रोजगार उपलब्ध होणार आहे. तीन हजार रुपये इतके वेतन मिळणार आहे. या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहनही मंत्री सरनाईक यांनी केले. (Contractual recruitment in ST)

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संचालक मंडळ बैठकीत भरतीचा निर्णय घेण्यात आला. बससेवा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक असलेले चालक व सहाय्यक मनुष्यबळ भाडेतत्त्वावर तीन वर्ष कालावधीसाठी घेण्याकरता ई-निविदा प्रक्रिया अवलंबण्यात येणार आहे. अर्थात, ही ई-निविदा प्रक्रिया सहा प्रादेशिक विभाग निहाय राबवण्यात येणार आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मनुष्यबळ पुरविणाऱ्या संस्थांकडून राज्य परिवहन महामंडळाला आवश्यक मनुष्यबळ वेळेत उपलब्ध होईल. कंत्राटी पद्धतीने भरती होणाऱ्या चालक व सहाय्यक उमेदवाराला सुमारे ३० हजार वेतन देण्यात येणार आहेरच उमेदवारांना एसटी कडून प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे. बसेसची वाढवण्यात येणार असून त्यासाठी लागणारे मनुष्यबळ मिळाल्यानंतर प्रवाशांना अखंडित, सुरक्षित व दर्जेदार बससेवा पुरविणे शक्य होणार आहे, असा विश्वास मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे. (Contractual recruitment in ST)

लर्निंग लायसन्स सेवा होणार बंद

फेसलेस पध्दतीने काढलेल्या शिकाऊ वाहन परवान्याचा गैरफायदा घेण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे फेसलेस शिकाऊ परवाना पद्धत काढण्याच्या प्रक्रिया मध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. त्यासाठी फेसलेस शिकाऊ वाहन परवाना प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती द्यावी असे पत्र परिवहन विभागांने नॅशनल इनफॉर्माटिक्स सेंटरला ला दिल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. मंत्री सरनाईक म्हणाले की, बारावी पास झालेली १८ वर्षे पूर्ण झालेली मुले अशा पद्धतीने शिकाऊ वाहन परवाना प्राप्त करतात. शिकाऊ वाहन परवाना चालकासोबत एक कायमस्वरूपी वाहन परवाना प्राप्त व्यक्ती असणे गरजेचे आहे. परंतु या सर्व नियमांना फाटा देत काही तरुण-तरुणींनी बेदरकार वाहन चालवून अपघात घडवून आणल्याची अनेक उदाहरणे आहेत. याबरोबर ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी अपघात केलेले अनेक प्रकरणांमध्ये संबंधित चालकाकडे केवळ शिकाऊ परवाना असल्याचे देखील स्पष्ट झाले आहे. अशा गंभीर बाबींना आळा घालण्यासाठी फेसलेस शिकाऊ वाहन परवाना देण्याची पद्धतीमध्ये अमुलाग्र बदल करणे गरजेचे आहे. (Contractual recruitment in ST)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00