Home » Blog » अजित पवार विमान अपघातातील ब्लॅक बॉक्स जळाला

अजित पवार विमान अपघातातील ब्लॅक बॉक्स जळाला

by प्रतिनिधी
0 comments
Ajit Pawar's black box from the plane crash burned

नवी दिल्ली : बारामती येथे झालेल्या अजित पवार विमान अपघातातील ब्लॅक बॉक्स जळाला असल्याचे नागरी उड्डाण मंत्रालयाने म्हटले आहे. ब्लॅक बॉक्स कधीच जळत नसताना नागरी उड्डाण मंत्रालयाच्या स्पष्टीकरणाबद्दल शंका उपस्थित केली जात आहे. दरम्यान अजित पवारांच्या अपघाताची सीबीआयकडून चौकशी करावी अशी मागणी उप मुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली आहे. दरम्यान अपघातासंबधी आमदार रोहित पवार उद्या बुधवारी पत्रकार परिषद घेणार आहेत.

अजित पवारांच्या विमान अपघाताची एएआयबी (AAIB) कडून चौकशी सुरू आहे. दरम्यान अपघातातील ब्लॅक बॉक्स जळाल्याचे वृत्तही अनेक माध्यमांनी दिले आहे. त्यामुळे रोहित पवारांनी या अपघातात घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. दरम्यान या संशयावर नागरी उड्डाणमंत्रालयाने याबाबत एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. (Ajit Pawar’s black box from the plane crash burned)

डेटा पुन्हा मिळवण्यासाठी संपर्क

नागरी उड्डाण मंत्रालयाने म्हटलं आहे की २८ जानेवारी बारामती येथे झालेल्या लेअरजेट ४५ विमान व्हीटी-एसएसके या अपघाताची एएआयबी सविस्तर चौकशी करत आहे. विमानात दोन स्वतंत्र फ्लाइट रेकॉर्डर होते. अपघातादरम्यान दोन्ही रेकॉर्डवर बराच काळा तीव्र उष्णतेच्या संपर्कात होते. आणि आगीमुळे त्यांचे नुकसान झाले आहे. एल थ्री कम्युनिकेश्यन्सद्वारे निर्मित डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर प्रयोगशाळेत यशस्वरित्या डाऊनलोड करण्यात आला आहे. हनीवेलद्वारे निर्मित कॉकपिट व्हाईस रेकॉर्डरची सविस्तर तांत्रिक तपासणी सुरू आहे. यातील डेटा पुन्हा मिळावा यासाठी उत्पादकाच्या मान्यताप्राप्त प्रतिनिधींशी संपर्क साधण्यात आला आहे, असेही नागरी उड्डाण मंत्रालयाने म्हटले आहे. (Ajit Pawar’s black box from the plane crash burned)

दिशाभूल करणारी माहिती पसरवू नये

विमान अपघात तपास ब्युरो सर्व तांत्रिक आणि प्रक्रियात्मक प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करुन सर्वसमावेशक, निष्पक्ष आणि पुराव्यावर आधारित तपास केला जाईल. ब्युरो पारदर्शकतेसाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे आणि तपासाच्या योग्य टप्पयावर पुढील माहिती देण्यात येईल, असंही मंत्रालयने म्हटलं आहे. या तपासाबाबत दिशाभूल करणारी माहिती पसरवू नये असे आवाहन त्यांनी केले.

राष्ट्रवादीकडून सीबीआय चौकशीची मागणी

राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली  राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सीबीआय चौकशी मागणी केली आहे. शिष्टमंडळात राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा समावेश होता.

विमानाचा ब्लॅक बॉक्स कसा जळला?

अमोल मिटकरी यांनी एक्स वर पोस्ट करताना म्हटले की, विमानाचा ब्लॅक बॉक्स हा त्याच्या टेलमध्ये म्हणजे त्याच्या शेपटीमध्ये असतो. त्याचं कारणच हे असतं की, ज्यावेळी विमानाचा अपघात होतो, त्यावेळी अनेकदा असं निदर्शनास आलंय की, विमानाची टेल ही पूर्णपणे जळत नाही. त्यामुळंच हा ब्लॅक बॉक्स विमानाच्या टेलमध्ये ठेवला जातो. अजितदादांच्या विमानाचा अपघात झाला, तेव्हा विमानाची शेपटी ही पूर्णपणे सुस्थितीत आहे. ती अजिबात जळालेली नाही. त्यामुळे या ब्लॅक बॉक्सला काहीही डॅमेज होण्याचा संबंध येत नाही. तसेच ब्लॅक बॉस असा बनवला गेला असतो की, हाय टेम्परेचरमध्ये सुद्धा कितीही आग लागली तरीही तो जळून खाक होत नसतो. त्यामुळे आता हा प्रश्न उपस्थित होतो की, अपघात झाला त्या विमानाचा ब्लॅक बॉक्स कसा जळला? असा प्रश्न उपस्थित करत अमोल मिटकरी यांनी ‘जस्टिस फॉर दादा’ असे हॅशटॅग वापरले आहे. (Ajit Pawar’s black box from the plane crash burned)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00