Home » Blog » Rohit Pawar lashes out at officer : आतापर्यंत तू गोट्या खेळत होतास का?; रोहित पवार अधिकाऱ्यावर उखडले

Rohit Pawar lashes out at officer : आतापर्यंत तू गोट्या खेळत होतास का?; रोहित पवार अधिकाऱ्यावर उखडले

by प्रतिनिधी
0 comments
Rohit Pawar lashes out at officer

कर्जत : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार त्यांच्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. मतदारसंघात अतिवृष्टीने झालेल्या पिकांची पाहणीही केली. तसेच नागरिकांच्या समस्याही जाणून घेतल्या. त्यासाठी आमसभाही त्यांनी घेतल्या. (Rohit Pawar lashes out at officer)

 शनिवारी (२० सप्टेंबर) जामखेडमध्येही विभागीय अधिकाऱ्यांची संयुक्त आमसभा घेतली. मात्र, या सभेवेळी नागरिकांनी समस्या मांडल्यानंतर एक अधिकारी मोघम उत्तरे देऊ लागला. नागरिकांच्या प्रश्नावर तो गंभीर दिसत नसल्याने रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला. पवार यांनी शेलक्या शब्दांत त्याचा चांगलाच समाचार घेतला.

जामखेडमधील एका नागरिकाने तो ज्या परिसरात राहतो तिथल्या गटारांची समस्या मांडली. कामे झालेली नाहीत, असे त्याने सांगितले. त्यावर अधिकाऱ्याने ‘‘तुमच्या भागात कामे सुरू आहेत,’’ असे सांगितले.’’ पण पावसाचे पाणी घरात शिरतेय, यावर तो काही बोलायला तयार नव्हता. कामावर कुठल्याही अधिकाऱ्याचं लक्ष नाही. कंत्राटदार त्याच्या मनाने वाट्टेल तसं काम करतोय, असे सांगत नागरिकांनी गटारांच्या कामाचे त्यांच्याकडील फोटो व व्हिडीओ दाखवले. (Rohit Pawar lashes out at officer)

यावर अधिकारी म्हणाले, “आम्ही खराब काम करत नाही. हवं तर उद्या तिथे जाऊन चेंबर पाहू.”

त्यावर आ. रोहित पवार संतापून म्हणाले, “ए… आतापर्यंत तू गोट्या खेळत होतास का? हे बावळट लोक आहेत का? ही वेडी माणसं आहेत का? खिशातला हात आधी काढ. लय शहाणा बनू नको. खूप मोठं काम करतोयस ते आम्हाला माहिती आहे. मिजासखोर बनू नकोस. या लोकांनी दाखवलेलं काम खराब आहे. हा तुमच्या बापाचा पैसा नाही. तू कुठलाही असशील, परंतु या लोकांना इथेच राहायचं आहे. ही खराब कामं आहेत आणि तू उद्या बघतो, करतो अशी उत्तर देतोयस. तुझे व तुझ्या अधिकाऱ्याचे पराक्रम आम्हाला माहिती आहेत. तू त्या कामावर कन्सल्टंट लाव आणि चांगल्या दर्जाचं काम कर. जास्त अहंकार दाखवू नको. उद्या ही माणसं पिसाळली तर तुला फिरता येणार नाही.” (Rohit Pawar lashes out at officer)
आ. पवार यांचा चढलेला पारा पाहून अधिकारी चपापले. या घटनेचा व्हिडीओही सर्वत्र व्हायरल झाला आहे.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00