Home » Blog » Mohanlal to be presented Phalke Award : अभिनेते मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

Mohanlal to be presented Phalke Award : अभिनेते मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

by प्रतिनिधी
0 comments
Mohanlal to be presented Phalke Award

नवी दिल्ली : दाक्षिणात्य ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांना शनिवारी (२० सप्टेंबर) देशाचा सर्वोच्च आणि प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ही घोषणा केली. २०२३ चा पुरस्कारासाठी त्यांची ही निवड करण्यात आली आहे. २३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार समारंभात तो प्रदान केला जाईल. (Mohanlal to be presented Phalke Award)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोहनलाल यांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी ‘एक्स’ वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, “श्री मोहनलाल जी उत्कृष्ट आणि बहुमुखी प्रतिभेचे प्रतीक आहेत. मल्याळम चित्रपटसृष्टीबरोबरच त्यांनी रंगभूमीवरही आपल्या समृद्ध अभिनयाची छाप उमटवली आहे. केरळच्या संस्कृतीबद्दल त्यांना अतीव प्रेम आहे. त्यांनी तेलुगू, तमिळ, कन्नड आणि हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विविध माध्यमांमध्ये त्यांची सिनेमॅटिक आणि नाट्यमय प्रतिभा खरोखरच प्रेरणादायी आहे. त्यांची कामगिरी येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत राहो.” (Mohanlal to be presented Phalke Award)

माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे की, “लालेटन @मोहनलाल जी यांचे अभिनंदन. केरळच्या आदिपोली, सुंदर भूमीपासून ते जगभरातील प्रेक्षकांपर्यंत, त्यांच्या कार्याने आपली संस्कृती समृद्ध केली आहे. त्यांचा वारसा भारताच्या सर्जनशील भावनेला प्रेरणा देत राहील.”

मंत्रालयाने दुसऱ्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे, : “दादासाहेब फाळके पुरस्कार निवड समितीच्या शिफारसीनुसार, श्री मोहनलाल यांना २०२३ चा प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करताना भारत सरकारला आनंद होत आहे. मोहनलाल यांचा उल्लेखनीय चित्रपट प्रवास पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे!” (Mohanlal to be presented Phalke Award)

मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांनी यावर्षी वयाची पासष्टी पार केली आहे. चार दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत त्यांनी सुमारे ४०० चित्रपटांमध्ये काम केले आहे. पाच राष्ट्रीय पुरस्कार आणि केरळ राज्याचे अनेक सन्मान मिळवले आहेत. केंद्र सरकारने त्यांना २००१ मध्ये पद्मश्री आणि २०१९ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00