Home » Blog » डॉ.आंबेडकरांच्या धोरणामुळे भारत देश उर्जा क्षेत्रात स्वयंपूर्णकडे : मुख्यमंत्री फडणवीस

डॉ.आंबेडकरांच्या धोरणामुळे भारत देश उर्जा क्षेत्रात स्वयंपूर्णकडे : मुख्यमंत्री फडणवीस

by प्रतिनिधी
0 comments
Chief Minister pays tribute to Dr. Ambedkar

जमीर काझी :  मुंबई : राष्ट्रीय विद्युत ग्रीडची संकल्पना भारताने बाबासाहेबांमुळे वेळेत स्वीकारली. त्यातून देश ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करत आहे.  भारतीय लोकशाहीची भक्कम पायाभरणी आणि सामान्य जनतेच्या हक्कांचे रक्षण हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळेच शक्य झाले. समाजातील विषमता दूर करून समता, बंधुता आणि सर्वांना समान संधी देणारे संविधान त्यांनी देशाला दिले. ज्ञानाच्या बळावर त्यांनी समाजात समतेची जाणीव दृढ केली. जगातील सर्वोत्तम संविधान भारताकडे असून प्रत्येक प्रश्नाचे उत्तर याच संविधानात मिळते, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. दादरच्या चैत्यभूमीवर राज्यपाल देवव्रत यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मान्यवरांनी अभिवादन केले. इंदू मिल स्मारकाचे काम पुढच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पूर्ण केले जाईल,असे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

‘भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. इतक्या मोठ्या राष्ट्रात एकता, न्याय व समतेची संघटित भावना दृढ करण्यासाठी संविधान निर्माण करणे हे अत्यंत मोठे व ऐतिहासिक कार्य होते. देशाच्या सामाजिक विविधतेत सर्वांना एकत्र आणणारे आणि समान अधिकार प्रदान करणारे संविधान हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्राला दिले, अशा शब्दात राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आंबेडकरांना अभिवादन केले. यावेळी राज्यपाल म्हणाले,’डॉ. बाबासाहेब आंबेडकर अमर आहेत. कठोर परिस्थितीतून शिकून त्यांनी संपूर्ण समाजाचा भविष्यकाळ बदलण्यासाठी शिक्षणाला सर्वात मोठे शस्त्र मानले. एक सुशिक्षित व्यक्ती संपूर्ण घराचे, समाजाचे आणि देशाचे भविष्य बदलू शकतो हा संदेश त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दिला. (Chief Minister pays tribute to Ambedkar)

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर लाखो अनुयायांनी त्यांच्या स्मृतीला अभिवादन केले. बाबासाहेबाचा जयघोष करीत राज्याच्या कानकोपऱ्यातून अबाल वृद्ध भीमसैनिक याठिकाणी जमले आहेत.  विविध माध्यमातून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. ग्रंथप्रदर्शन,’ एक वही एक पेन’अभियान राबविण्यात आले. (Chief Minister pays tribute to Ambedkar)

माजी खासदार प्रकाश आंबेकर, आनंदराज आंबेडकर, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, आमदार विजय वडेट्टीवार, खासदार वर्षां गायकवाड, विधानसभा उपाध्यक्ष  अण्णा बनसोडे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, कौशल्य, रोजगार, नावीन्यता मंत्री  मंगलप्रभात लोढा, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, माजी मंत्री  संजय बनसोडे, आमदार  कालिदास कोळंबकर, चित्रा वाघ,  अमित साटम,  महाराष्ट्र राज्य त्रिभाषा धोरण समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र जाधव, बृहन्मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी, कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे आदींनी अभिवादन केले. (Chief Minister pays tribute to Ambedkar)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00