Chaos in Assembly : काँग्रेस कार्यालयावर हल्ल्याच्या निषेधार्थ विधानसभेत गोंधळ

नागपूर : विशेष प्रतिनिधी : भाजपा युवा मोर्चाने मुंबई काँग्रेस कार्यालयावर केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी भाजपा आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. विधानसभेत याबाबत स्थगन प्रस्ताव मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तो अध्यक्षांनी नाकारला. त्यावरून सत्ताधारी व विरोधकांत घोषणाबाजी झाल्याने मोठा गोंधळ उडाला. त्यामुळे दहा मिनिटे कामकाज तहकूब करावे लागले. (Chaos in Assembly )

राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा गृहमंत्री अमित शाह यांनी अवमान केला. त्याच्या निषेधार्थ राज्यात काँग्रेसच्या वतीने ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. त्यामुळे चिडलेल्या भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मुंबई काँग्रेस कार्यालयाची तोडफोड केली होती. त्यांचे पडसाद शुक्रवारी हिवाळी अधिवेशनात उमटले. सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी ‘मविआ’च्या नेत्यांनी पायऱ्यावर निदर्शने करीत हल्लेखोरावर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर विधानसभेत कामकाज सुरू झाल्यानंतर माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी स्थगन प्रस्ताव मांडण्याचा प्रयत्न केला.  मात्र अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नकार दिल्याने सभागृहात गोंधळ उडाला. विरोधकांनी ‘जय भीम’च्या घोषणा देत सत्ताधाऱ्यांचा निषेध केला. त्याला सत्ताधारी बाजूकडून प्रत्युत्तर देण्यात येऊ लागल्याने गोंधळ उडाला. त्यामुळे दहा मिनिटे कामकाज स्थगित करण्यात आले.(Chaos in Assembly )

यावेळी वडेट्टीवार म्हणाले, आमच्या पक्ष कार्यालयावर हल्ला करण्यात आला. काचा फोडण्यात आल्या, खुर्च्या फेकण्यात आल्या. आमच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या फोटोंवर शाई फेकण्यात आली. मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांचा फोटो फाडण्यात आला. या हल्ल्यात कार्यालयातील कर्मचारी जखमी झाले. बहुमताच्या जोरावर सत्तेची मस्ती करत असाल ते योग्य नाही. मीडियाला दोन तास आधी भाजप युवा मोर्चाच्या आंदोलनाची माहिती होती, मग पोलिसांना का नव्हती? असा सवाल वडेट्टीवार यांनी केला.

हेही वाचा :

बीड हत्याकांडातील आरोपीवर ‘मोक्का’; जिल्हा पोलीसप्रमुखाची बदली 
भाजपच्या गुंडगिरीच्या निषेधार्थ मुंबई काँग्रेसची मंत्रालयावर निदर्शने

Related posts

मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदासाठी चढाओढ

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली

उद्धव-राज ठाकरे एकत्र