Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी १२ जानेवारीला संघनिवड

Champions Trophy

नवी दिल्ली : पुढील महिन्यात रंगणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी वन-डे क्रिकेट स्पर्धेसाठी १२ जानेवारीपर्यंत भारताच्या प्राथमिक संघाची निवड करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) नियमांनुसार या स्पर्धेसाठी प्राथमिक संघनिवड करण्याची अंतिम मुदत १२ जानेवारी आहे. तथापि, योग्य कारण दिल्यास १३ फेब्रुवारीपर्यंत संघांमध्ये बदल करण्याची मुभाही आयसीसीने दिली आहे. (Champions Trophy)

पाकिस्तानमध्ये १९ फेब्रुवारी ते ९ मार्चदरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा रंगणार आहे. तब्बल ८ वर्षांनंतर ही स्पर्धा होत असून ८ संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होतील. भारताने पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार दिल्यामुळे भारताचे स्पर्धेतील सामने दुबईमध्ये खेळवण्यात येणार आहेत. स्पर्धेत सहभागी आठही देशांना १२ जानेवारीपर्यंत संघ जाहीर करावे लागणार आहेत. त्यानंतर पुढील महिन्याभरात संघांना वैध कारणास्तव खेळाडू बदलण्याची मुभा राहील. आयसीसीला सुपूर्द केलेले संघ जाहीर करण्याचा किंवा न करण्याचा निर्णय हा संबंधित निवडसमितीचा असेल. १३ फेब्रुवारीस आयसीसीतर्फे सहभागी संघ जाहीर करण्यात येतील, अशी माहिती आयसीसीच्या एका अधिकाऱ्याने दिली. (Champions Trophy)

या स्पर्धेकरिता भारतीय संघाच्या निवडीबाबत उत्सुकता आहे. भारताने मागील वर्षभरात केवळ तीन वन-डे सामने खेळले आहेत. ऑगस्टमध्ये झालेली श्रीलंकेविरुद्धची ही मालिका भारताने ०-२ अशी गमावली होती. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध पाच टी-२० आणि तीन वन-डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. २२ जानेवारीपासून टी-२० मालिकेस, तर ६ फेब्रुवारीपासून वन-डे मालिकेस सुरुवात होईल. या मालिकेसाठीही अद्याप संघनिवड बाकी आहे. त्यामुळे, सध्या प्राथमिक संघ आयसीसीकडे पाठवून इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील खेळाडूंच्या कामगिरीनुसार त्या संघामध्ये आवश्यक बदल करण्यात येतील, असे समजते. (Champions Trophy)

हेही वाचा :

बुमराह इंग्लंडविरुद्धच्या मालिकेस मुकणार?
हरमनप्रीत, रेणुकाला विश्रांती

Related posts

Badminton : छत गळतीमुळे प्रणॉयचा सामना थांबवला

Sam Konstas : ‘होय, चूक माझीच होती!’

South Africa : दक्षिण आफ्रिकेचा एकतर्फी मालिका विजय