चंपई सोरेन यांचा भाजप प्रवेश

रांची
झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. प त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता. रांची येथे झालेल्या समारंभात चंपई सोरेन यांनी समर्थकांसह भाजप प्रवेश केला. या वेळी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान, आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व सरमा उपस्थित होते. रांची तसेच दिल्लीत आपल्यावर पाळत ठेवल्यानंतर भाजप प्रवेशाला बळ मिळाल्याचे सोरेन यांनी नमूद केले. काँग्रेसने आदिवासी अस्मिता धोक्यात आणल्याचा आरोप करुन भाजप आदिवासींना न्याय देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मेहनत घेऊन झारखंड मुक्ती मोर्चामध्ये काम केले. मात्र माझा अवमान करण्यात आला. तो मी सहन करू शकत नाही, असे ते म्हणाले.

चंपई सोरेन यांच्या भाजप प्रवेशाने आदिवासीबहुल जागांवर भाजपला लाभ होईल. चंपई हे झारखंड मुक्ती मोर्चाचे सर्वेसर्वा शिबू सोरेन यांचे निकटवर्तीय मानले जातात. झारखंड टायगर म्हणून चंपई ओळखले जातात. हेमंत सोरेन तुरुंगात गेल्यावर दोन फेब्रुवारीला चंपई यांच्याकडे झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे आली. मात्र हेमंत यांना जामीन मिळाल्यावर चंपई यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले. अपमानास्पदरीत्या पदावरून काढल्याचा आरोप चंपई यांनी केला होता.

Related posts

Sambhal : संभलमध्ये आढळली १५० वर्षांपूर्वीची बारव

पंतप्रधान मोदी कुवेतच्या ‘सर्वोच्च नागरी पुरस्कारा’ने सन्मानित

अमेरिका सैन्याने स्वत: चे एफ १८ फायटर जेट पाडले