कोल्हापूर : प्रतिनिधी : ‘उद्योगपती अदानींच्या मुद्यावर विरोधकांना विचलित करण्यासाठी शहा यांनी आंबेडकर हा मुद्दा आणला,’ असा आरोप आंबेडकरवादी चळवळीतील विचारवंत ॲड. सुरेश माने यांनी केला. (Book Publication)
बहुजन ऐक्य चळवळ वतीने ‘आंबेडकर… आंबेडकर… आंबेडकर… आधुनिक भारताचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर,’ या विषयावर रविवारी शाहू स्मारक भवन येथे व्याख्यान झाले. त्यावेळी ते बोलत होते. संसदेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल काढलेल्या अवमानजनक उद्गाराबद्दल माने यांनी शाह यांचा समाचार घेतला.(Book Publication)
ॲड. माने म्हणाले की, संसदेत गृहमंत्री अमित शहा यांनी आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचे देशभर पडसाद उमटले. उत्तर भारतात ते अधिक उमटले. शहा यांच्याविरोधात वर्धा येथे पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. उद्योगपती अदानींच्या मुद्यावर विरोधकांना विचलित करण्यासाठी शहा यांनी आंबेडकर हा मुद्दा आणला.’(Book Publication)
मच्छिंद्र कांबळे म्हणाले, ‘बाबासाहेब आंबेडकरांबद्दल कोणी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यास प्रत्येक आंबेडकरवादी पेटून उठतो. चळवळीचे हे बळ आहे.’
यावेळी एम. के. फाउंडेशननिर्मित १० राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘वणवा’ या लघुपटाचे सादरीकरण करण्यात आले. एम. के. पब्लिकेशनतर्फे लेखिका प्रज्ञा कांबळे यांच्या ‘सावित्रीबाई फुले जीवन कार्य’ आणि ‘राजर्षी शाहू महाराज जीवन कार्य,’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. अध्यक्षस्थानी बहुजन ऐक्य चळवळचे अध्यक्ष मच्छिंद्र कांबळे होते.
विचारमंचावर लेखक अनंत मांडुकलीकर, विनोद माने, समीर जमादार होते. कार्यक्रमास अमित नागटिळे, रामचंद्र कांबळे, सुशीलकुमार कोल्हटकर उपस्थित होते.
हेही वाचा :
कुराणाची छोटी आणि मराठी प्रतही पाहता येणार