सांगली : प्रतिनिधी : राज्यात गणेशोत्सवाचे मंगलमय वातावरण असताना सांगलीच्या प्रसिद्ध् श्री गणपती पंचायतनच्या मंदिरात वाद घडल्याने उत्सवाला डाग लागला आहे. पटवर्धन घराण्याची मुलगी अभिनेत्री भाग्यश्रीने वडिल विजयसिंह राजे यांच्याविरोधात गणेश उत्सवाच्या पहिल्याच दिवशी बंड पुकारत गणपतीची आरती केल्याने मंदिरात मोठा वाद झडला. संस्थानिकातील उत्तराधिकारी पदावरुन वाद उफाळल्याची चर्चा सुरू झाली आहे. (Controversy over Bhagyashree performing the Aarti)
अभिनेत्री भाग्यश्री आणि व्यवस्थापकांत खडाजंगी
सांगलीतील पटवर्धन घराण्याच्या श्री गणपतीवर भाविकांची मोठी श्रध्दा आहे. सांगली संस्थानाच्या गणेश उत्सव जगभरात प्रसिद्ध आहे. गणेशाची पूजा करण्याचा मान पटवर्धन घराण्यातील राजघराण्याकडे आहे. पण काल गणेश चतुर्थीच्या दिवशी पटवर्धन करण्याची राजकन्या अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन दासांनी सांगलीतील गणपती मंदिरात पोचली. गणेशाची प्रतिष्ठापना करण्यासाठी उत्सव मूर्ती दरबार हॉलकडे जाण्यासाठी आरती करण्यात येणार होती. त्यासाठी युवराज अदित्य राजे पटवर्धन यांना बोलावण्यात आले. पण भागश्रीने थेट गणपती मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला आणि आरती केली. या घटनेने खळबळ उडाली. राजे विजयसिंह पटवर्धन यांची प्रकृती ठीक नसल्याने आम्ही मुलींपैकी कोणी तरी यावे म्हणून आरती केली असा दावा त्यांनी केला. यावेळी मंदिराचे व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर आणि भागश्री यांच्यात खडाजंगी झडली. पूजेला विरोध करणाऱ्या अभ्यंकरांना भाग्यश्रीने तुम्ही मला कोण सांगणार असा सवाल करुन अभ्यंकरांना निरुत्तर केले. मी इथला व्यवस्थापक आहे सांगताच भाग्यश्रीचा संतापाचा अनावर झाला. त्यामुळे मंदिरात या वादाला तोंड फुटले. (Controversy over Bhagyashree performing the Aarti)
भाग्यश्रीच्या वर्तनाने विजयसिंह राजे संतापले
या वादानंतर विजयसिंह राजे चांगलेच संतापले. त्यांनी प्रतिक्रिया देताना भाग्यश्रीला कोणताही अधिकारी नाही. ती आणि तिच्या नवऱ्यासोबत कोणतेही व्यवहार करु नका. मी राजा असून अदित्य पटवर्धन यांना राजकुमार म्हणून जाहीर केले आहे. यापुढे अदित्य राजेच संस्थानाचे पुढचे राजे असणार आहेत. युवराजांना थांबवून भाग्यश्री यांनी आरती करणे, लोकांना घेऊन मंदिराच्या गाभाऱ्यात घुसणे हे योग्य नाही. त्यांना असा करण्याचा अधिकार नाही. भाग्यश्री आणि त्याचे पती हिमालय यांच्याशी संस्थानाच्या मालमत्तेबद्दल कोणीही व्यवहार करु नये असे स्पष्ट केले आहे.
म्हातारा-म्हातारी मेल्यावर सगळं आमचंच
भाग्यश्री आणि तिचे पती हिमालय दासांनी यांनी संस्थानात मोठा गैरव्यवहार केला आहे. त्यामुळे त्यांना संस्थानातून काढून टाकण्यात आले असे विजयसिंह पटवर्धन यांनी सांगितले. उद्या म्हातारा-म्हातारी मेल्यानंतर हे सगळं आमचंच आहे’ असे मुलगी आणि जावयाने विधान केले आहे असा आरोप विजयसिंह पटवर्धन यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.
व्यवस्थापक अभ्यंकरांचा मुलगा घेतला दत्तक
सांगली संस्थानामध्ये २०१३ ते २०१६ या कालावधीत भाग्यश्री आणि पती हिमालय यांनी संस्थानाचे काम पाहिले. मात्र त्यांच्या काळात त्यांनी केलेल्या आर्थिक आणि जमीन व्यवहारावरुन विजयसिंह राजे यांनी त्यांच्याकडून सर्व अधिकारी काढून घेतले. त्यानंतर विजयसिंह यांनी जयदीप अभ्यंकर यांच्या १६ वर्षाच्या मुलगा अदित्य याला दत्तक घेऊन संस्थानाचे अधिकृत उत्तराधिकारी घोषीत केले आहे. (Controversy over Bhagyashree performing the Aarti)