- देवदत्त पटनायक
बौद्ध धर्मात पावित्र्य आणि ब्रह्मचर्य याचा अर्थ स्त्रियांपासून दूर राहणे असा मानला जात होता. गौतम बुद्ध होण्यासाठी सिद्धार्थाने पत्नीचा त्याग केला होता. जैन धर्मातही अशीच भूमिका दिसून येते. मात्र येथे आपण बौद्ध धर्मावर लक्ष केंद्रित करूया, जो आज स्वतःला “समतावादी” आणि “लिंगसंवेदनशील” म्हणवून घेतो. प्रत्यक्षात तो कधीच तसा नव्हता. (Hatred of women among Sanatani)
स्त्रियांना आसक्ती, मोह आणि आध्यात्मिक अधःपतनाचे कारण मानले जात असे. आदर्श भिक्षूकडून स्त्रियांपासून दूर राहण्याची अपेक्षा केली जाई, कारण स्त्रीदेहालाच मोक्षप्राप्तीच्या मार्गातील अडथळा समजले जात होते. या विचारसरणीत स्त्रिया अपवित्रतेचे प्रतीक बनल्या आणि त्यांच्यापासून दूर राहणे हे पावित्र्याचे लक्षण मानले गेले.
स्त्रियांविषयी संशय हा धार्मिक सद्गुण
याच विचारसरणीने स्त्रियांकडून काय अपेक्षित असावे, हेही ठरवले. “पवित्र” स्त्रीने स्वतःचे स्त्रीत्वच नाकारावे, अशी अपेक्षा होती. तिने डोके मुंडवावे, दागिने सोडावेत, रंगीबेरंगी वस्त्रे त्यागावीत आणि सौंदर्याच्या सर्व बाह्य खुणा पुसून टाकाव्यात. आध्यात्मिकतेच्या नावाखाली तिने “कमी स्त्री” दिसणे, हेच सन्मानास पात्र ठरण्याचे साधन मानले गेले. (Hatred of women among Sanatani)
हेही वाचाः मंदिरे पाडून लुटणारे आणि बांधून लुटणारे!
यामुळे स्त्रियांविषयीचा संशय हा धार्मिक सद्गुण बनला. तपस्व्याच्या मनात वासना का निर्माण झाली, हा प्रश्न विचारण्याऐवजी संपूर्ण दोष स्त्रीवर टाकण्यात आला आणि तिलाच प्रलोभनाचे कारण ठरवण्यात आले. अशा प्रकारे स्त्रीद्वेषालाच आध्यात्मिकतेचे रूप देण्यात आले. स्त्रियांविषयीचा तिरस्कार किंवा भीती ही मोह-मायेपासून मुक्ती असल्याचे सांगितले गेले, तर त्यांच्यापासून दूर राहणे हे पावित्र्य आणि ब्रह्मचर्याचे लक्षण ठरले. नंतरच्या सनातनी परंपरांनीही हा दृष्टिकोन स्वीकारला आणि या श्रद्धांमागील विचारांना प्रश्न विचारण्याऐवजी स्त्रियांपासून दूर राहणे हीच आध्यात्मिक उपलब्धी मानली.
पारंपरिक बौद्ध साहित्यातील उदाहरणे
पारंपरिक बौद्ध साहित्य आणि संस्थांमध्ये या विचारसरणीची अनेक उदाहरणे आढळतात :
१. भिक्षुणींसाठी बनवलेल्या आठ नियमांनुसार प्रत्येक भिक्षुणीला प्रत्येक भिक्षूपेक्षा कनिष्ठ स्थान देण्यात आले, मग ती कितीही ज्येष्ठ असो. अनेक दशकांपासून दीक्षा घेतलेल्या भिक्षुणीलाही नव्याने दीक्षा घेतलेल्या भिक्षूसमोर नतमस्तक व्हावे लागत असे. (Hatred of women among Sanatani)
२. “पाच अडथळे” (Five Obstacles) या संकल्पनेनुसार स्त्रीदेहात असताना कोणतीही स्त्री पूर्ण बुद्ध, सार्वभौम सम्राट किंवा काही सर्वोच्च आध्यात्मिक पदे प्राप्त करू शकत नाही.
३. अनेक महायान ग्रंथांमध्ये असे म्हटले आहे की पूर्ण बुद्धत्व प्राप्त करण्यापूर्वी स्त्रीला पुरुष म्हणून पुनर्जन्म घ्यावा लागतो. लोटस सूत्राच्या बाराव्या अध्यायात ड्रॅगन राजाच्या आठ वर्षांच्या मुलीची कथा आहे. ती प्रथम पुरुषात रूपांतरित होते आणि त्यानंतरच बुद्धत्व प्राप्त करते.
हेही वाचाः पेपरफुटी आणि एकलव्याचा अंगठा
४. बौद्ध ग्रंथांमध्ये वारंवार हा विचार मांडला गेला आहे की स्त्रीने प्रथम वडिलांवर, नंतर पतीवर आणि शेवटी मुलावर अवलंबून राहावे.
५. अनेक पवित्र पर्वत, मठ आणि मंदिरांच्या परिसरात स्त्रियांना प्रवेशबंदी होती, कारण त्यांना धार्मिकदृष्ट्या अपवित्र मानले जात होते.
६. मध्ययुगीन जपानी बौद्ध धर्मात “ब्लड पॉण्ड हेल” (रक्तकुंड नरक) ही संकल्पना विकसित झाली. मासिक पाळी आणि प्रसूतीमुळे झालेल्या कथित अशुद्धतेसाठी स्त्रियांना या नरकात यातना भोगाव्या लागतात, अशी धारणा होती.
७. अनेक बौद्ध ग्रंथांमध्ये स्त्रीदेहाला अशुद्ध, घृणास्पद, कुजणारा किंवा अपवित्र म्हटले आहे. भिक्षूंना कामवासना जिंकण्यासाठी अनेकदा कुजणाऱ्या प्रेतांवर — ज्यांपैकी अनेक स्त्रियांची असल्याचे वर्णन आहे — ध्यान करण्यास प्रोत्साहित केले जात असे.
८. स्त्रियांना अशा धोकादायक मोहिनी घालणाऱ्या शक्ती म्हणून चित्रित केले गेले की त्या भिक्षूंना आध्यात्मिक मार्गापासून विचलित करू शकतात. काही ग्रंथांमध्ये त्यांची तुलना राक्षस, दैत्य किंवा मनाला गुलाम बनवणाऱ्या शिकाऱ्यांशी करण्यात आली आहे. (Hatred of women among Sanatani)
९. आईचे प्रेमही अनेकदा सांसारिक मोहाचेच एक रूप मानले गेले. काही कथांमध्ये महान भिक्षूंच्या मातांनाही आपल्या मोहामुळे दुःखद पुनर्जन्म मिळाल्याचे वर्णन आहे.
१०. एका पारंपरिक श्रद्धेनुसार, बुद्धांनी असे भाकित केले होते की, स्त्रियांना भिक्षुसंघात प्रवेश दिल्यास त्यांच्या शिकवणीचा प्रभाव एक हजार वर्षांऐवजी केवळ पाचशे वर्षेच टिकेल.
मोक्षप्राप्तीतील अडथळा
एकूणच, या विचारांनी अशी धार्मिक संस्कृती घडवली की ज्यामध्ये स्त्रियांना मोक्षाच्या समान साधिका मानण्याऐवजी मोक्षप्राप्तीतील अडथळा समजले जाऊ लागले. सर्वोच्च आध्यात्मिक आदर्श म्हणजे स्त्रियांपासून दूर राहणे, त्यांची भीती बाळगणे किंवा स्त्रीत्वाचाच त्याग करणे, असा बनला. पावित्र्याची सांगड स्त्रियांपासून अंतर राखण्याशी घालण्यात आली, तर स्त्रीत्वाला मोह, अपवित्रता आणि धोक्याशी जोडण्यात आले.
म्हणूनच सनातनी रामाची पूजा सीतेशिवाय, कृष्णाची पूजा राधेशिवाय आणि शिवाची पूजा गौरीशिवाय करतात. (Hatred of women among Sanatani)
सनातनींनी हिंदूंच्या “जय सियाराम” या घोषणेचा त्याग करून “जय श्रीराम” हा नवा घोष निर्माण केला… जो पूर्णपणे स्त्रीला नाकारण्यासारखा आहे.
हा बौद्ध किंवा जैन प्रभाव होता का? की वैदिक?
हिंदू आणि तांत्रिक परंपरा तर स्त्रियांच्या बाजूने उभ्या असल्याचे सांगितले जाते.