Home » Blog » Nawid Mushrif: नाविद मुश्रीफ ‘गोकुळ’चे अध्यक्ष

Nawid Mushrif: नाविद मुश्रीफ ‘गोकुळ’चे अध्यक्ष

by प्रतिनिधी
0 comments
Nawid Mushrif

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ)च्या अध्यक्षपदी शुक्रवारी (३० मे) नाविद मुश्रीफ यांची निवड करण्यात आली. अरूण डोंगळे यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्यानंतर सहकार क्षेत्रात नावलौकिक असलेल्या या दूध संघाचे राजकारण ढवळून निघाले होते. तसेच डोंगळे यांनी राजीनामा दिल्यानंतर अध्यक्ष कोण होणार याची उत्सुकताही ताणली होती. या पार्श्वभूमीवर नाविद मुश्रीफ यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. (Nawid Mushrif)

नाविद मुश्रीफ हे राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव आहे. संघाच्या अध्यक्षपदी गोकुळचे संस्थापक असलेले आनंदराव पाटील यांचे चिरंजीव शशिकांत पाटील चुयेकर यांची निवड होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्यांच्या नावावर संचालकांमध्ये एकमतही झाल्याचे बोलले जात होते. शिवाय नाविद यांच्या नावाला खुद्द हसन मुश्रीफ यांनीही विरोध केला होता.

दरमम्यान, डोंगळेंच्या भूमिकेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करत महायुतीचाच अध्यक्ष झाला पाहिजे, असा आग्रह धरला त्यामुळे मुश्रीफ यांचाही नाईलाच झाला. निवडीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेच्या अध्यक्षांच्या दालनात बैठक झाली. चर्चेअंती नावाचा लिफाफा ज्येष्ठ संचालक आणि माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आणि नाविद मुश्रीफ यांचे नाव घोषित करण्यात आले.  (Nawid Mushrif)

पंधरा दिवसापूर्वी अरुण डोंगळे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला होता. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा देऊ नये असा आदेश दिल्याने त्यांनी राजीनामा देण्यास नकार दिला होता. पण डोंगळे वगळून गोकुळच्या १७ संचालकांची आणि जिल्ह्यातील नेत्यांची एकी दिसून आल्याने अखेर डोंगळेंना राजीनामा द्यावा लागला. गोकुळमध्ये पक्षीय राजकारण आणायचे नसल्याने गोकुळचा अध्यक्ष महायुतीचा कि महाविकास आघाडीचा हा विषय आता मागे पडला आहे.

हेही वाचा :
आपण किती राफेल विमाने गमावली : रेवंत रेड्डी

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00