Home » Blog » Modi surpasses Indira Gandhi  : नरेंद्र मोदींनी इंदिरा गांधीना मागे टाकले

Modi surpasses Indira Gandhi  : नरेंद्र मोदींनी इंदिरा गांधीना मागे टाकले

by प्रतिनिधी
0 comments
Modi surpasses Indira Gandhi

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४०७८ दिवस पंतप्रधानपदावर कार्यरत राहताना माजी पंतप्रधान इंदिरा गांधींना मागे टाकले. सलग सर्वाधीक काळ पंतप्रधानपदावर राहण्याचा इंदिरा गांधीचा विक्रम मोदींनी ४८ वर्षाचा मोडीत काढला. (Modi surpasses Indira Gandhi)

पंतप्रधान मोदी यांनी त्याच्या कारकिर्दीतील एक महत्वाचा टप्पा शुक्रवारी पार पाडला. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २४ जानेवारी ते २४ मार्च १९७७ या काळात त्यांनी सलग ४०७७ दिवस काम केले. मोदींनी २०१४ ते आजअखेर ४०७८ दिवसांचा कार्यकाळ पूर्ण करुन इंदिरा गांधी यांच्या कारकिर्दीला मागे टाकले आहे. (Modi surpasses Indira Gandhi)

देशात पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर १९५२ पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंनीच एप्रिल १९५२ ते २७ मे १९६४ पर्यंत सर्वात जास्त काळ सरकारमध्ये प्रमुख म्हणून राहण्याचा विक्रम केला आहे. त्यानंतर इंदिरा गांधी सलग पंतप्रधानपदी राहिल्या. त्यानंतर त्यांचा विक्रम मोडित काढत पंतप्रधान मोदी तब्बल ४०७८ दिवस पंतप्रधानपदी कायम राहिले आहेत.

पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपप्रणित एनडीएने २०१४, २०१९ आणि २०१४ या सलग तीन लोकसभेच्या निवडणूकीत विजय मिळवला. मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्रीपद १३ वर्षे भूषविले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष देशातील प्रथम क्रमांकाचा पक्ष बनला आहे. पंतप्रधान पदावर सर्वात जास्त काळ पंतप्रधान पद भूषवलेले ते पाहिले गैर काँग्रेसी पंतप्रधान आहे. (Modi surpasses Indira Gandhi)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00