Home » Blog » Sugarcane movement : उसाला ३७५१ रुपये दर न दिल्यास आंदोलन तीव्र होणार : राजू शेट्टी

Sugarcane movement : उसाला ३७५१ रुपये दर न दिल्यास आंदोलन तीव्र होणार : राजू शेट्टी

by प्रतिनिधी
0 comments
Sugarcane movement

कोल्हापूर : प्रतिनिधी :  सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय कारखानदार एकत्रित येवून  उसाला प्रतिटन ३४०० ते ३४५० पर्यंत पहिली उचल देत आहेत.  कारखान्यांची उचल आम्हाला मान्य नसून ऊस परिषदेत केलेल्या प्रतिटन ३७५१ रूपयाबाबत तोडगा नाही झाला तर कार्यकर्त्यांनी भूमिगत होवून आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचे आदेश स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिले. (Sugarcane movement)

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस आंदोलनासंदर्भात शासकीय विश्रामगृह येथे आज शनिवारी बैठक झाली. बैठकीत राजू शेट्टी यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.  

ऊस दराबाबत पालकमंत्र्यांना मार्ग काढण्याची मागणी

राजू शेट्टी म्हणाले,  सांगली , कोल्हापूर व कर्नाटक सीमाभागात ऊस आंदोलनाची तीव्रता वाढत आहे.राज्य सरकारने साखर कारखानदार व शेतकरी संघटना यांचेसोबत मध्यस्थी करून गळीत हंगाम सुरू होण्यापुर्वी तोडगा काढावी अशी आमची अपेक्षा होती. मात्र राज्य सरकार व कारखानदार या मुद्याकडे दुर्लक्ष करू लागले आहेत.  सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांशी साखर कारखान्यांनी एफ. आर. पी. जाहीर केलेली आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सोमवारी सर्व  शेतकरी संघटना , कारखानदार व प्रशासनाची बैठक घेऊन  मार्ग काढण्याचे  मागणी केली आहे. (Sugarcane movement)

साखरेच्या उपपदार्थातून कारखान्यांना उत्पन्न

गतवर्षी साखर कारखान्यांनी साखरेसह उपपदार्थातून चांगले पैसे मिळविले आहेत. यावर्षीसुध्दा साखर , इथेनॅाल , मोलॅसिस , बगॅस या उपपदार्थांना चांगला दर मिळत आहे. काटामारी व रिकव्हरी चोरीतून शेतक-यांची लूट केली जात आहे. हंगामाच्या सुरवातीस कारखानदारांनी गुंडाच्या करवी संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करत आहेत. यामुळे शेतक-यांनी ऊसाला चांगला भाव पाहिजे असल्यास संघटित होवून आंदोलनाची तीव्रता वाढवावी लागेल, असे मत शेट्टी यांनी व्यक्त केले. प्रशासन व राज्य सरकारने तातडीने तोडगा काढावा. राज्याचे मुख्यमंत्री बुधवारी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहेत. त्या पार्श्वभुमीवर कार्यकर्त्यांनी भुमिगत होवून आंदोलनाची तयारी करावी असे आवाहनही केले. (Sugarcane movement)

दालमिया कारखान्याला हिसका दाखवणार

दालमिया साखर आसुर्ले पोर्ले या कारखान्याची एफ. आर. पी. तोडणी वाहतूक वजा जाता ३६४२ रूपये इतकी आहे. या कारखान्याने आज ३५२५ रूपये दर जाहीर केला आहे. एफ. आर. पी. मध्ये मोडतोड केल्याने उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने कारखान्याच्या विरोधात अवमान याचिका दाखल करण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतला आहे.  कोल्हापूर जिल्ह्यातील रिकव्हरी चोरी करणारे सर्वपक्षीय कारखान्यांनी दालमिया कारखान्यावर दबाव टाकून एफ आर पी मध्ये मोडतोड करण्यास भाग पडले. मात्र कारखान्याला संघटनेचा व न्यायालयाचा हिसका दाखविणार असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.  

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00