विकसित महाराष्ट्रासाठी महायुतीला आशीर्वाद द्या

मुंबई : विशेष प्रतिनिधी : गेल्या अडीच वर्षांत केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकारमुळे महाराष्ट्राने विकासाची नवी उंची गाठली आहे. समाजातील सर्व घटकांचा विकास आणि महिला सन्मान हे भारतीय जनता पार्टीचे ध्येय आहे. त्यानुसारच विकासाची कामे गतीने होत आहेत. विकसित महाराष्ट्रासाठी महायुतीला आशीर्वाद द्या, असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केले.

त्या म्हणाल्या, ‘एकीकडे विकासाला गती  देणारी महायुती, तर दुसरीकडे ‘मतासांठी झूठ, सत्तेत ज आल्यावर लूट आणि देशातील जनतेत फूट’ अशी नीती असणारी महाविकास आघाडी आहे. प्रचारात अन्य काँग्रेसचे नेते आता महाराष्ट्रात राज्यांतील खोटारडेपणाचे मायाजाल पसरवायला आले आहेत. कर्नाटकात आताची दिवाळखोरीची स्थिती पाहता निवडणूक काळात काँग्रेसने दिलेल्या खोट्या आश्वासनांमुळे राज्याची तिजोरी खाली झाली हेच सिद्ध झाले आहे. कर्नाटकला दिवाळखोरीच्या मार्गावर आणणाऱ्या काँग्रेस पक्षाने आदिवासी आणि  दलित समाजाच्या प्रगतीसाठी राज्याच्या तिजोरीतील सुमारे दहा हजार कोटींचा निधी आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी इतरत्र वळवला आहे.

राजस्थानात जनतेला भुरळ घालून मते मिळवण्यासाठी काँग्रेसने बेरोजगारांना भत्ता देण्याचे जाहीर केले. पण तिथे ना बेरोजगारांना रोजगार मिळाला ना भत्ता. त्यामुळे मागील विधानसभा निवडणुकीत तरुणांचा जोश आणि जनतेचा रोष पाहायला मिळाला. इराणी म्हणाल्या, जे नेते हरियाणाच्या निवडणुकीत जिलेबीची फॅक्टरी उघडण्यासाठी इच्छुक होते त्यांना हरियाणाच्या जनतेने चोख उत्तर दिले आहे.

Related posts

प्रसिद्ध दिग्दर्शक शाम बेनेगल यांचे निधन

महसूल मंत्री बावनकुळेंना रामटेक; धनंजय मुंडेंना सातपुडा तर राम शिंदेंचे ज्ञानेश्वरीत असणार वास्तव्य!

मुख्यमंत्र्यांचा बंडाच्या पवित्र्यातील भुजबळांना सबुरीचा सल्ला