Home » Blog » एमएमआरडीए अभियांत्रिकी भरती परीक्षेतही घोटाळा?

एमएमआरडीए अभियांत्रिकी भरती परीक्षेतही घोटाळा?

by प्रतिनिधी
0 comments
Scam in MMRDA engineering recruitment exam

जमीर काझी : मुंबई : भाजपा सरकारच्या काळात परिक्षांना पेपरफुटीचे ग्रहण लागले असून सरकार एकही परीक्षा व्यवस्थित घेऊ शकत नाही. नीट, टीईटी पेपरफुटीनंतर आता एमएमआरडीएच्या अभियांत्रिकी भरती परीक्षेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे.  त्याच्या निकाल आणि गुणवत्ता यादीसंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे.  या घोटाळ्याची उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सखोल चौकशी करावी, अशी मागणी  प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस धनंजय शिंदे यांनी केली आहे. (Scam in MMRDA engineering recruitment exam)

मेरीट लिस्टमधील विद्यार्थी एकाच केंद्रावरील

 टिळक भवन येथील पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, एमएमआरडीएने २३५ जागांसाठी घेतलेल्या परिक्षेचा निकाल १४ ऑगस्टला जाहीर करण्यात आला आहे.त्यामध्ये ज्या विद्यार्थांना २०० पैकी १९० पेक्षा जास्त मार्क्स मिळालेले मेरिट लिस्टमधील १, २, व ३ क्रमांकाचे विद्यार्थी एकाच केंद्रावरील आहेत, ४, ५ व ६ क्रमांकाचे विद्यार्थी एकाच केंद्रावरील आहेत. तसेच ७,८ व ९, १०, ११ आणि १४ व १५ क्रमांकाचे विद्यार्थी हे एकाच परीक्षा केंद्रावरील आहेत. अभियांत्रिकीच्या ज्या वेगवेगळ्या विभागातील परीक्षामध्ये याच मेरिट लिस्टमधील विद्यार्थांना १०० पैकी ७.५, १० व १५ असे गुण मिळाले आहेत.  १९७, १९८ मार्क्स मिळवलेल्या विद्यार्थ्यांनी बीएमसी च्या अभियांत्रिकी परिक्षेत मात्र १०, १५ मार्क्स मिळवले आहेत. जी चार मुले टॉपर आली आहेत त्यांचे वडील नगर विकास विभागातील वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत, हे सर्व पाहता एमएमआरडीएच्या परिक्षेत मोठा घोटाळा झालेला दिसत आहे. ,याची सखोल चौकशी करून परिक्षा रद्द करावी. सर्व परिक्षा ऑफलाईन घ्याव्यात, अशी मागणी धनंजय शिंदे यांनी केली आहे. काँग्रेस पक्ष विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून त्यांना मिळवून देण्यासाठी एमएमआरडीएला जाब विचारू. (Scam in MMRDA engineering recruitment exam)

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा एमएमआरडी चे अध्यक्ष एकनाथ शिंदे, एमएमआरडी चे महानगर आयुक्त, संजय मुखर्जी यांनी परिक्षेतील घोटाळ्यावर खुलासा करावा. तसेच संजय मुखर्जी यांची तीन वर्षाची मुदत संपली असतानाही ते एमएमआरडीएच्या महानगर आयुक्त पदावर अद्याप कायम कसे आहेत, याचाही खुलासा करण्याची त्यांनी मागणी केली आहे. (Scam in MMRDA engineering recruitment exam)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!