नवी दिल्ली : भारतीय शिष्टमंडळाची अमेरिकेसोबतची चर्चा ‘रचनात्मक’ बैठका झाल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. तथापि, पुढील अधिकृत बैठकीची तारीख जाहीर केलेली नाही. (India-US talk)
वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या नेतृत्वाखालील भारतीय शिष्टमंडळाने या आठवड्यात न्यूयॉर्क दौऱ्यात अमेरिकन सरकारच्या अधिकाऱ्यांसोबत ‘रचनात्मक’ बैठका घेतल्या, असे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.
त्यात असेही म्हटले आहे की, दोन्ही बाजूंनी द्विपक्षीय व्यापार कराराच्या संभाव्य रूपरेषांवरही चर्चा केली. तथापि, करारासाठी औपचारिक वाटाघाटीची पुढील तारीख निश्चित झाली आहे की नाही याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला नाही. भारतीय शिष्टमंडळ २२ ते २४ सप्टेंबर दरम्यान अमेरिकेत होते. श्री. गोयल काही दिवसांनी भारतात परतले, असे सूत्रांनी स्पष्ट केले. (India-US talk)
‘‘मंत्र्यांनी अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी राजदूत जेमिसन ग्रीर आणि भारतात नियुक्त अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर यांच्याशी बैठका घेतल्या,’’ असे या निवेदनात म्हटले आहे.
द्विपक्षीय व्यापारविषयक बाबींवर अमेरिकन सरकारच्या प्रतिनिधींशी झालेल्या बैठकींव्यतिरिक्त, भारतीय शिष्टमंडळाने भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार आणि गुंतवणूक कशी वाढवायची यावर अमेरिकेतील प्रमुख व्यवसाय आणि गुंतवणूकदारांशी चर्चा केली. (India-US talk)
शिष्टमंडळाने कराराच्या विविध पैलूंवर अमेरिकन सरकारशी रचनात्मक बैठका घेतल्या. दोन्ही बाजूंनी कराराच्या संभाव्य रूपरेषांवर विचारांची देवाणघेवाण केली आणि परस्पर फायदेशीर व्यापार करार लवकर पूर्ण करण्यासाठी चर्चा सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.