Bihar News : बिहारमध्ये विषारी दारूचे चार ब‍ळी; दोघांना अंधत्व

पाटणा; वृत्तसंस्था : बिहारमध्ये दारूबंदी असतानाही छपरा येथे दारू पिऊन एका तरुणाचा मृत्यू झाला आहे, तर दोन जणांची दृष्टी गेली आहे. दुसरीकडे, सिवानमध्येही तीन जणांचा मृत्यू झाला आहे. (Bihar News)

मिळालेल्या माहितीनुसार, पहिली घटना छपराच्या मशरक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आहे. तिथे दारू पिऊन एका तरुणाचा मृत्यू झाला. इस्लामुद्दीन असे मृताचे नाव आहे. दोन जणांची दृष्टी गेली असून शमशाद आणि मुमताज अन्सारी अशी त्यांची नावे आहेत. सारणचे जिल्हा जनसंपर्क अधिकारी रवींद्र कुमार यांनी सांगितले की, इब्राहिमपूर गावात विषारी दारू प्यायल्याने एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे, तर दोन जण गंभीर आजारी आहेत. आजारी लोकांना उपचारासाठी सदर हॉस्पिटल छपरा येथे आणण्यात आले असून, तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कुमार म्हणाले, की घटनेची माहिती मिळताच मशरक उपविभागीय पोलिस अधिकारी अमरनाथ यांच्यासह पोलिस दल या गावात पोहोचले आणि प्रकरणाचा तपास करत आहेत.

दुसरीकडे, सिवान जिल्ह्यातही तीन जणांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. हे प्रकरण भगवानपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मागदी आणि २२ कठा गावातील असल्याचे सांगण्यात आले. विषारी दारू प्यायल्याने तिघांचा मृत्यू झाल्याचे लोकांचे म्हणणे आहे. ही बातमी समोर आल्यानंतर पोलिस सतर्क झाले आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. तपास अहवाल समोर आल्यानंतरच याबाबत बोलणे योग्य ठरेल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. (Bihar News)

हेही वाचा :

Related posts

pooja khedkar: पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन फेटाळला

Sheikh Hasina : शेख हसीनांना आमच्याकडे सोपवा

Rahul gandhi : सोमनाथची पोलिसांकडूनच हत्या