अजित पवार देणार सुरज चव्हाणला २ बीएचके घर

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : बिग बॉस मराठीचा विजेता सूरज चव्हाण याने आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. सूरज चव्हाण याच्यासोबत त्यांनी भरपूर गप्पा मारल्या. सूरज चव्हाण याच्यासाठी अजित दादांनी मोठी घोषणा देखील केली. काय होती ती घोषणा आणि काय म्हणाला सूरज चव्हाण जाणून घ्या…

बिग बॉसच्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण याने आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.त्यांच्या सोबत गप्पा मारल्या.यावेळी सूरजला टू बीएचके घर बांधून देणार असल्याची यावेळी अजित पवार यांनी सांगितले. (Suraj Chavan)

पुढे बोलताना ते म्हणाले की, सूरज बारामतीमधील मोढवे गावाचा आहे. सुरवातीला रिल्स काढत असताना सुरजला बिग बॉसमध्ये संधी मिळाली त्याचा मनमोकळा स्वभाव आणि थोडं बोलण्यात अडकणं हे लोकांना भावलं. त्याला सुसज्ज २ बीएचके घर बांधून देण्याचा निर्णय घेतलाय. सूरज चव्हाण पुढचं आयुष्य सुखकर होण्यासाठी मी रितेश देशमुखशी बोलणार असल्याचं देखील अजित पवार यांनी म्हटले आहे.

सूरज चव्हाणने छातीवर काढलेल्या उमाजी नाईक यांच्या टॅटू विषयीही त्यांनी माहिती घेतली. सूरजने आपल्या स्टाईलने अजितदादांना भरपूर हसवलं. सुरज चव्हाण हा विजयी झाल्यापासून गावागावात त्याची मिरवणूक काढली जात आहे. बिग बॉसच्या घरात आल्यापासून सूरज चव्हाणला लोकांचा पाठिंबा मिळाला. सूरज चव्हाणने बिग बॉस मराठीची ट्राफी जिंकली.

हेही वाचा :

Related posts

अल्लू अर्जुनच्या घरावर दगडफेक

Pushpa २ ला कन्नडमध्ये “UI” कडून धोबीपछाड

Pushpa : The Rule – Part 2 चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ