Belgaum Murder: प्रेयसीला भोसकून आत्महत्या

Belgaum Murder

बेळगाव :  प्रेमविवाहाला विरोध केल्याने प्रियकराने प्रेयसीला भोसकून स्वतःही भोसकून घेत आत्महत्या केली. ही घटना बेळगावातील नवी गल्ली  येथे घडली. या घटनेने बेळगाव शहरात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. (Belgaum Murder)

प्रशांत कुंडेकर (२९) आणि ऐश्वर्या लोहार यांचे गेल्या दीड वर्षांपासून प्रेमसंबंध होते. प्रशांतने ऐश्वर्याशी लग्न करण्यासंबंधी तिच्या आईशी चर्चा केली होती. त्यावेळी आईने त्याला तू आणखी थोडे पैसे कमव मग लग्न लावून देते, असे सांगितले होते. (Belgaum Murder)

ऐश्वर्या संध्याकाळी आपल्या मावशीच्या घरी आली असताना प्रशांतही तेथे गेला. त्याने तिथे पुन्हा लग्नाचा विषय काढला. यावेळी अचानक प्रशांतने चाकू काढून ऐश्वर्याला भोसकले. स्वतःवरही चाकूचे वार करून घेऊन स्वतःला संपवले. या घटनेमुळे शहरात डबल मर्डर झाल्याची उलटसुलट चर्चा सुरु होती. पोलीस आयुक्त यडा मार्टिन मारब्यांग यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. घटनास्थळी विषाची बाटलीही सापडली.

हेही वाचा :

फडणवीस, अजित पवारांची अब्रू धुळीला मिळवून धनंजय मुंडे यांचा राजीनामा

मुंडेंच्या राजीनाम्याने सरकारवरील रक्ताचे डाग धुऊन निघणार नाहीत…

Related posts

Salman Khan : बॉम्बने गाडी उडवण्याची सलमान खान ला धमकी

Coast Guard : १८०० कोटी किंमतीचे अंमली पदार्थ जप्त

Mehul Choksi : मेहुल चोक्सी ला बेल्जियममध्ये अटक