Australia Test : पहिल्या दिवशी पावसाचा खेळ

ब्रिस्बेन : बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी क्रिकेट मालिकेतील तिसऱ्या सामन्यामध्ये पहिल्या दिवशीचा बहुतांश खेळ पावसामुळे वाया गेला. पहिल्या सत्रामध्ये खेळलेल्या अवघ्या १३.२ षटकांमध्ये ऑस्ट्रेलियाने बिनबाद २८ धावा केल्या होत्या. (Australia Test)

ब्रिस्बेनच्या गॅबा स्टेडियमवर हा सामना सुरू आहे. ब्रिस्बेनमध्ये शनिवारपासूनच वातावरण ढगाळ होते. या वातावरणाचा, तसेच गॅबाच्या हिरव्यागार खेळपट्टीचा विचार करता भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघामध्ये ॲडलेड कसोटीच्या तुलनेत दोन बदल करण्यात आले. रवीचंद्रन अश्विनऐवजी रवींद्र जडेजा आणि हर्षित राणाऐवजी आकाशदीप यांना भारतीय संघात स्थान मिळाले. गॅबा स्टेडियमवर खेळलेल्या मागील सातपैकी सहा सामन्यांमध्ये प्रथम गोलंदाजी करणारा संघ जिंकला आहे. भारतीय वेगवान गोलंदाजांना मात्र पहिल्या दिवशी सुरुवातीच्या षटकांमध्ये विकेट काढण्यात यश आले नाही. ५.३ षटकांनंतर पावसाला सुरुवात झाल्यामुळे खेळ थांबवण्यात आला. (Australia Test)

अर्ध्या तासानंतर पुन्हा खेळास सुरुवात झाली. त्यानंतर, उस्मान ख्वाजा आणि नॅथन मॅकस्विनी या ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी सावध खेळ करत यशस्वीपणे किल्ला लढवला. या ७.५ षटकांमध्ये भारतीय गोलंदाजांनी केवळ ९ धावा दिल्या. १३.२ षटकांचा खेळ झाल्यानंतर पुन्हा पावसामुळे खेळ थांबवण्यात आला. त्यानंतर, दिवसभर पावसाची संततधार सुरू राहिल्याने अखेर दिवसाचा खेळ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. (Australia Test)

हेही वाचा :

वेस्ट इंडिजचे निर्भेळ यश
बुद्धीबळाच्या पटावरचा नवीन ‘राजा’

https://www.espncricinfo.com/series/australia-vs-india-2024-25-1426547/australia-vs-india-3rd-test-1426557/full-scorecard

 

 

 

Related posts

Modi Letter : ‘तुझी निवृत्ती जणू कॅरम बॉल’

England Cricket : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर!

‌Team India Practice : रोहित, आकाशदीपला किरकोळ दुखापत