ऑस्ट्रेलियाचे निर्भेळ यश

वृत्तसंस्था, होबार्ट : गोलंदाजांची प्रभावी कामगिरी आणि मार्कस स्टॉइनिसच्या तडाखेबाज खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने मालिकेतील तिसऱ्या टी-२० क्रिकेट सामन्यात पाकिस्तानचा ७ विकेटनी पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या या मालिकेत ३-० असे निर्भेळ यश मिळवले.

या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानचा डाव ११७ धावांत संपुष्टात आला. पाककडून बाबर आझमने २८ चेंडूंमध्ये ४ चौकारांसह सर्वाधिक ४१ धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाच्या ॲरन हार्डीने ३, तर ॲडम झाम्पा आणि स्पेन्सर जॉन्सन यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या. पाकचे माफक आव्हान ऑस्ट्रेलियाने बाराव्या षटकात तीन विकेट्सच्या मोबदल्यात पार केले. ऑस्ट्रेलियाकडून स्टॉइनिसने २७ चेंडूंमध्ये ५ चौकार व ५ षटकारांच्या साहाय्याने नाबाद ६१ धावांची खेळी केली. कर्णधार जोश इंग्लिसने २४ धावा करून त्याला उपयुक्त साथ दिली.

संक्षिप्त धावफलक : पाकिस्तान – १८.१ षटकांत सर्वबाद ११७ (बाबर आझम ४१, हसिबुल्ला खान २४, ॲरन हार्डी ३-२१, ॲडम झाम्पा २-११) पराभूत विरुद्ध ऑस्ट्रेलिया – ११.२ षटकांत ३ बाद ११८ (मार्कस स्टॉइनिस नाबाद ६१, जोश इंग्लिस २७, जहाँदाद खान १-१७, अब्बास आफ्रिदी १-१४).

Related posts

Modi Letter : ‘तुझी निवृत्ती जणू कॅरम बॉल’

England Cricket : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर!

‌Team India Practice : रोहित, आकाशदीपला किरकोळ दुखापत