ATM Cracked:एटीएम फोडून १८ लाख लांबवले

ATM Cracked

कोल्हापूर : चोरट्यांनी बँकेचे एटीएम फोडून रोख १८ लाख ७७ हजार ३०० रुपये घेऊन पोबारा केला. पोलिसांनी नाकाबंदी करुन चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. पण चोरट्यांनी कार वेगाने बॅरिकेड्सवर घालून पलायन केले. शनिवारी (दि.४) मध्यरात्री कोल्हापूर जिल्ह्यातील दुर्गम चंदगड तालुक्यातील कोवाड गावात ही घटना घडली.(ATM Cracked)

चंदगड तालुक्यातील कोवाड गाव हे व्यापारी पेठ म्हणून ओळखले जाते. येथील स्टेट बँकेच्या शाखेतील एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने जाळून चोरट्यांनी १८ लाख ७७ हजार ३०० रुपये पळवले. चोरीचा प्रकार सुरू असताना ई सर्व्हिसमुळे हा प्रकार जिल्हा पोलिस विभागाला समजला. त्यांनी गडहिंग्लज आणि चंदगड पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

(ATM Cracked)गडहिंग्लजचे उपविभागीय अधिकारी रामदास इंगवले आणि चंदगडचे पोलिस निरीक्षक विश्वास पाटील यांनी फौजफाट्यासह नेसरीत नाकाबंदी केली. चोरट्यांच्या कारचा पाठलाग सुरू केला. चोरट्यांनी नाकाबंदीत उभारलेली बॅरिकेड्स तोडून हेब्बाळ (ता. गडहिंग्लज)च्या दिशेने पलायन केले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरूच ठेवला. त्यात चोरट्यांची कार पोलिसांच्या व्हॅनला धडकली. त्यामध्ये कारचा टायर आणि एअरबॅग फुटल्याने चोरट्यांनी कार सोडून पळ काढला. पोलिसांनी कार ताब्यात घेतली आहे. हेब्बाळ, कोवाडमधील सीसीसीटीव्ही फुटेज तपासून चोरट्यांच्या शोधासाठी पथके तयार करुन तपास सुरू केला आहे.

Related posts

Vachan Sankalp : विद्यापीठातील कट्ट्यांनी पुन्हा अनुभवले ‘वाचणारे’ विद्यार्थी!

Pune accident : बापासह दोन मुलांना ट्रकने चिरडले

Governor Meet :धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या