अरविंदला विजेतेपद

चेन्नई : भारताचा युवा बुद्धिबळपटू अरविंद चिदंबरमने चेन्नई ग्रँडमास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या स्पर्धेच्या अखेरच्या फेरीपर्यंत विजेतेपदासाठी चुरस पाहायला मिळाली. अरविंदने अगोदर पऱ्हम मॅगसुदलूला पराभूत करून विजेतेपदासाठी दावेदारी सांगितली. अरविंदसह लिव्हॉन अरॉनियन आणि अर्जुन एरिगैसी हे बुद्धिबळपटूही गुणतक्त्यात संयुक्तरीत्या प्रथम स्थानावर असल्याने विजेतेपदाकरिता टायब्रेकर लढती खेळवण्यात आल्या. या टायब्रेकर लढतींमध्ये अरविंदने अन्य दोन बुद्धिबळपटूंवर मात करून विजेतेपद निश्चित केले. या विजेतेपदासह अरविंदने २७०० एलो रेटिंग प्राप्त करणाऱ्या बुद्धिबळपटूंमध्ये स्थान पटकावले असून, अशी कामगिरी करणारा तो सहावा भारतीय बुद्धिबळपटू ठरला आहे. यापूर्वी अरविंदने २०१८ आणि २०१९ या सलग दोन वर्षी राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद पटकावले होते.    (Aravindh Chithambaram)

Related posts

‌Bengal Record : बंगालचा विक्रमी धावांचा पाठलाग

Mohammed Shami : शमीचा समावेश अद्याप दूरच

Tanush Kotian : तनुष कोटियनला ऑस्ट्रेलियाचे तिकीट