आजरा : तालुक्यातील किटवडे आणि सुळेरान येथे वाघाच्या हल्ल्यात बैल, व म्हशीसह तीन जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. या हल्ल्यामुळे तालुक्यातील पश्चिम भागात वाघाची दहशत निर्माण झाली असून आंबोली परिसरात वाघाचा वावर अधोरेखित झाला आहे.
किटवडे आणि सुळेरान येथे आठ दिवसांपूर्वी चरण्यासाठी सोडलेली गाय आणि म्हैस अर्धवट खालेल्या अवस्थेत आढळून आली होती. त्यानंतर पुन्हा रविवारी (दि.१५) एका म्हशीवर हल्ला चढवून तिला ठार केले आहे. बचाराम विष्णू चव्हाण, मधुकर पांडुरंग राणे (किटवडे) व रघुनाथ भाऊ पाटील (सुळेरान) अशी जनावरे मालकांची नावे आहेत.
आंबोली परिसरामध्ये भाघांचा वावर असल्याचे स्पष्ट झाले होते. सुळेरान, किटवडे हा परिसर आंबोली लगतच असल्याने वाघांचा वावर या परिसरात असल्याचे अधोरेखित झाले आहे. वन विभागाने याचा अधिक तपास केला असता मृत जनावरांच्या आजूबाजूला वाघाच्या पायाचे ठसे आढळून आले आहेत. वनविभागाने मृत जनावरांचे पंचनामे करून नुकसान भरपाईच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठांकडे अहवाल दाखल केले आहेत. तसेच या भागातील ज्यांची शेती जंगलालगत आहे अशा लोकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन वन विभागाने केले केले आहे. तसेच संध्याकाळी शेतात न थांबन्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा :
- छगन भुजबळ यांचे राजकारण संपले आहे का?
- Sangeet Mativilay कोल्हापूर केंद्रातून ‘संगीत मतीविलय’ प्रथम
- Zakir husain Vhatakar त्यांनी जवळ घेतलं, कडकडून मिठी मारली…