Home » Blog » Team Khandoba: ‘खंडोबा’ उपांत्य फेरीत, ‘सम्राटनगर’ पराभूत

Team Khandoba: ‘खंडोबा’ उपांत्य फेरीत, ‘सम्राटनगर’ पराभूत

अटल चषक फुटबॉल स्पर्धा

by प्रतिनिधी
0 comments
Team Khandoba

कोल्हापूर : प्रतिनिधी : अटल चषक फुटबॉल स्पर्धेत खंडोबा तालीम मंडळाने सम्राटनगर स्पोर्टसचा ३-० असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. माजी पंतप्रधान अटलबिहारी वायपेयी यांच्या स्मरणार्थ स्पर्धेचे आयोजन केले आहे. भाजप आणि तटाकडील तालीम मंडळ आयोजित ही स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर खेळवली जात आहे. (Team Khandoba)

खंडोबा संघाने सम्राटनगर स्पोर्टस् अतिशय चांगल्या खेळाचे प्रदर्शन घडवले. दोन्ही संघांनी सुरवातीपासून आघाडीसाठी प्रयत्न केले. ३३ व्या मिनिटाला गोलची कोंडी फोडण्यात खंडोबा संघाला यश आले. अमिन खजिनने सम्राटनगरची बचावफळी भेदत गोल केला. मध्यंतरापूर्वी चाळीसाव्या मिनिटाला अमीन खजिनला डीमध्ये अवैधरित्या रोखल्याने पंचांनी पेनल्टी किक बहाल केली. या सुवर्णसंधीचा लाभ घेत रोहन आडनाईकने गोल केला. मध्यंतरास खंडोबा संघ २-० आघाडीवर होता. (Team Khandoba)

उत्तरार्धात खंडोबाने सम्राटनगर संघास गोलची परतफेड करण्यास संधी मिळू दिली. उलट ५८ व्या मिनिटाला अमिन खजीरने वैयक्तिक दुसरा आणि संघाचा तिसरा गोल केला. पूर्णवेळेत तीन गोलची आघाडी कायम टिकवत खंडोबाने सामना जिंकला. अमिन खजिनची सामनावीर म्हणून निवड झाली. (Team Khandoba)

मंगळवारचा सामना : पाटाकडील तालीम मंडळ अ वि. संयुक्त जुना बुधवार पेठ, दुपारी ४.०० वा.

हेही वाचा :
पुढच्यावेळी योग्य संघबांधणी महत्त्वाची
श्रेयस, ईशानची वापसी

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00