Home » Blog » 32 burglaries solved : तीन चोरट्यांकडून ३२ घरफोड्या

32 burglaries solved : तीन चोरट्यांकडून ३२ घरफोड्या

६७ लाखांचे दागिने हस्तगत

by प्रतिनिधी
0 comments
32 burglaries solved

कोल्हापूर : प्रतिनिधी : स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने तीन अट्टल चोरट्यांना पकडून जिल्ह्यातील घरफोडीचे ३२ गुन्हे उघडकीस आणले. त्यांच्याकडून सोन्याचे ६१ तोळे आठ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तर चांदीचे चार किलो ७८७ ग्रॅम वजनाचे दागिने हस्तगत केले. (32 burglaries solved)

कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. कोल्हापूर जिल्ह्यात वाढत्या घरफोडीच्या पार्श्वभूमीवर विशेष पोलिस महानिरीक्षक फुलारी, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना सूचना दिल्या. एलसीबीने वेगवेगळी पथके तयार करुन गुन्हा घडलेल्या ठिकाणी भेट देऊन, तांत्रिकदृष्ट्या तपास करून गुन्हे उघडकीस आणले. (32 burglaries solved)

एलसीबीतील पोलिस उप निरीक्षक शेष मोरे यांच्या पथकातील सागर माने, महेश खोत, संजय कुंभार, लखनसिंह पाटील, महेश पाटील, विजय इंगळे यांच्या पथकाला सलीम शेख (महाड जि. रायगड)  हा बेळगाव येथे वास्तव्यास असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. पोलिसांचे पथक वेषांतर करुन बेळगावमध्ये तपास करत होते पण तो मिळून आला नाही. दरम्यान सलीम शेख हा रायगडवरुन बेळगावकडे दुचाकीवरुन येणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी ११ एप्रिल रोजी शाहूवाडी तालुक्यातील अंबा घाटात सापळा रचून सलीम शेख (वय ३७)  जावेद महंमद शेख (३०, रा. दोघे रा. गंधारपाले, साहिलनगर,ता. महाड, जि. रायगड ), यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी करुन त्यांना अटक केली. १३ दिवसांच्या पोलिस कोठडीत त्याच्याकडे चौकशी करुन गुन्ह्याची उकल केली. घरफोडीच्या गुन्ह्यात सलीम शेखचा सावत्र भाऊ तौफिक महंमद शेख (वय ३० रा. रुमाले मळा, आर.के.नगर मुळ गाव चिक्कोडी, जि. बेळगाव) याचे नाव चौकशीत निष्पन्न झाले. तिघां चोरट्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात ३२ घरफोडी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून ६१ तोळे  असा माल हस्तगत केला. (32 burglaries solved)

तपास पथकातील अधिकारी, कर्मचारी

स्थानिक गुनहे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलिस उप निरीक्षक शेष मोरे, सागर माने, महेश खोत, संजय कुंभार, लखनसिंह पाटील, महेश पाटील, विजय इंगळे, संदीप बेंद्रे, शुभम संकपाळ, विशाल चौगुले, प्रविण पाटील, अमित सर्जे, अरविंद पाटील, सागर चौगले, अमोल कोळेकर, सुरेश पाटील, कृष्णात पिंगळे, सुशील पाटील, राजेंद्र वरंडेकर, राजेश राठोड, रोहित मर्दाने, यशवंत कुंभार, नामदेव यादव, सायबर पोलिस ठाण्याच् उप निरीक्षक अतिश म्हेत्रे, सायली कुलकर्णी, प्रज्ञा पाटील.  (32 burglaries solved)

सलीम शेख सराईत गुन्हेगार

सलीम शेख हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खेड, दापोली, रोहा, माणगांव, पोलादपूर, गोरेगाव या ठिकाणी १२ चोरी, घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. त्यांचा साथीदार तौफिक शेख मोटार सायकल चोरीतील आरोपी आहे. (32 burglaries solved)

उघडकीस आलेले ३२ गुन्हे असे

करवीर पोलिस ठाणे १८, गांधीनगर ०२, जुना राजवाडा ०५, लक्ष्मीपुरी ०२, शाहूपुरी ०२, राजारामपुरी ०२, कागल ०१.

वर्षनिहाय उघडकीस आलेले गुन्हे

वर्ष २००२ मध्ये सात गुन्हे उघडकीस, २०२३ मध्ये ११, २०२४ मधील १०, २०२५ मधील चार असे ३२ गुन्हे उघडकीस आले आहेत. (32 burglaries solved)

हेही वाचा :

कुणाल कामरांचा जबाब चेन्नईत जाऊन नोंदवा

‘एलईटी’च्या दहशतवाद्याचा खात्मा

सुरक्षा यंत्रणेत त्रुटी असल्याची कबुली

दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटात उद्धवस्त

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00