Home » Blog » Baba Desai : भाजपचे ज्येष्ठ नेते बाबा देसाई यांचे निधन

Baba Desai : भाजपचे ज्येष्ठ नेते बाबा देसाई यांचे निधन

भाजप स्थापनेपासून सक्रीय कार्यकर्ते

by प्रतिनिधी
0 comments
Baba Desai

कोल्हापूर : प्रतिनिधी : भाजपचे येथील ज्येष्ठ नेते विजय ऊर्फ बाबा भाऊसाहेब देसाई (वय ७६) यांचे शनिवारी मध्यरात्री अल्पशः आजाराने खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज रविवारी सकाळी कळंबा स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार झाले. यावेळी कोल्हापूर दक्षिणचे भाजपचे आमदार अमल महाडिक, भाजप जिल्हा नाथाजी पाटील यांच्यासह सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.  (Baba Desai)

बाबा देसाई भाजपच्या कोल्हापुरातील स्थापनेपासूनचे सक्रिय कार्यकर्ते होते. भाजपचे ज्येष्ठ नेते सुभाष वोरा, गोपाळराव माने यांनी पक्षाच्या स्थापनेपासून पक्षाचे काम करत जनतेच्या प्रश्नांवर आंदोलन करुन ते सोडवण्याचे प्रामाणिकपणे प्रयत्न  केले.  ते भाजप कामगार मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस तसेच पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष आणि संघटनमंत्री होते. भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीवर ते कायम निमंत्रित सदस्य होते. २०१४ मध्ये राज्यात भाजप महायुतीची सत्ता आल्यावर पक्षाने त्यांना कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ गोकुळ मध्ये  संचालक म्हणून काम करण्याची संधी दिली.  शाहू मिलमध्ये दीर्घकाळ सेवा बजावली. ते मूळचे पुष्पनगर (ता. भुदरगड) येथील होते. सध्या शहराजवळील करवीर तालुक्यातील कळंबा या गावी त्यांचे वास्तव्य होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, दोन बहिणी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पत्रकार प्रवीण देसाई यांचे ते वडील होत. रक्षा विसर्जन सोमवारी सकाळी साडेऊ वाजता होणार आहे. (Baba Desai)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00