Home » Blog » UPSC result : मेंढरं चारत असतानाच बिरदेवला फोन आला…

UPSC result : मेंढरं चारत असतानाच बिरदेवला फोन आला…

बिरदेव डोणेचे युपीएससी परीक्षेत यश

by प्रतिनिधी
0 comments
UPSC result

कोल्हापूर : प्रतिनिधी : मेंढरं चारत असतानाच बिरदेवला फोन आला…. युपीएससी परीक्षेत पास झालास. जिद्दीने अभ्यास करुन स्पर्धा परिषदेत यश मिळालेल्या कागल तालुक्यातील यमगे गावच्या  बिरदेव सिद्धाप्पा डोणे याच्या कुटुंबियांवर अभिनंदनाचा वर्षाव झाला. (UPSC result)

मंगळवारी सायंकाळी त्याच्या मित्राचा फोन आला तेव्हा बिरदेव कुटुंबासमवेत बेळगाव परिसरात मेंढराचा कळपात चारत होता. दोन दिवसांनी तो पायी चालत यमगे गावातील घरी परतणार आहे. त्याच्या स्वागतची गावकऱ्यांनी तयारी केली आहे. (UPSC result)

घरची परिस्थिती बेताची असल्याने जिल्हा परिषद शाळेच्या व्हरांड्यात बिरदेवने अभ्यास केला. दहावीच्या केंद्रात गावात पहिला आला. बारावीत विज्ञान शाखेत चांगले गुण मिळवून पुण्यात स्थापत्य विभागात शिक्षण पूर्ण केली. यूपीएससीचे ध्येय बाळगून थेट दिल्ली गाठली. दोन प्रयत्नात अपयश आले. पण चिकाटीने अभ्यास करुन युपीएससी परीक्षेत यश मिळवले. (UPSC result)

मंगळवारी युपीएससीचा निकाल जाहीर झाल्यावर बिरदेव डोणेने ५५१ रँक मिळवले. डोणेच्या वडिलांचा मेंढपाळाचा वडलोपार्जित व्यवसाय असल्याने बिरदेवचे लहानपण शेळ्या मेंढ्या सांभाळण्यात गेले. मुलांनी शिकून मोठं व्हावं यासाठी डोणे कुटुंबाने त्याला चांगले शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले. घरात वीज नसल्याने यमगे गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या व्हरांड्यात अभ्यास केला अशी आठवण वडील सिद्धाप्पा यांनी सांगितली. गेली चार वर्षे त्याने दिल्लीत चांगला अभ्यास केला. तो नियमित पुस्तके वाचायचा. वर्तमानपत्राचे सखोल वाचन करायचा. दोन परिक्षेचा अनुभव असल्याने यावेळी गेल्या परिक्षेतील चुका टाळून अभ्यासावर भर दिला. तिसऱ्या प्रयत्नात त्याला यश मिळाले. बिरदेवची यशोगाथा युवा पिढीला प्रेरणा देणारी ठरणारी आहे. (UPSC result)

हेही वाचा :

कोल्हापुरात प्रायोगिक तत्त्वावर ‘स्वस्थ जन्म अभियान’

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00