कोल्हापूर : प्रतिनिधी : शिवाजी तरुण मंडळाने वेताळमाळ तालीम मंडळावर ३-० असा विजय मिळवत अटल चषक फुटबॉल स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश केला. माजी पंतप्रधान अटलबिहारी वायपेयी यांच्या स्मरणार्थ भाजप आणि तटाकडील तालीम मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धेचे आयोजन केले आहे. (Shivaji enter final)
छत्रपती शाहू स्टेडियमवर झालेल्या सामन्यात शिवाजी तरुण मंडळाने पूर्वार्धात वर्चस्व मिळविले. सामन्याच्या आठव्या मिनिटाला करण चव्हाण बंदरेने गोल करत शिवाजी संघाचे खाते खोलले. १८ व्या मिनिटाला सिद्धेश साळोखेने गोल केला. दोन गोलच्या पिछाडीमुळे वेताळमाळ संघाची लय बिघडली. त्याच फायदा घेत दर्शन पाटीलने २६ व्या मिनिटाला गोल केला. मध्यंत्तरापर्यंत शिवाजी संघ ३-० असा आघाडीवर होता. (Shivaji enter final)
उत्तरार्धात खेळ कंटाळवाणा झाला. वेताळमाळने आघाडी कमी करण्यासाठी प्रयत्न केले. पण शिवाजीने भक्कम बचाव कायम ठेवला. पूर्वार्धातील तीन गोलची आघाडी पूर्णवेळेत कायम राखत शिवाजी संघाने सामना जिंकून उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला. (Shivaji enter final)
गुरुवारचा सामना : संयुक्त जुना बुधवार पेठ वि. संध्यामठ तरुण मंडळ, दुपारी ४.००वा.
हेही वाचा :
पहेलगाममधील मृतांना आयपीएलमध्ये श्रद्धांजली