Home » Blog » श्री अंबाबाई मंदिर परिसरात यंदा ‘एआय’ वॉच

श्री अंबाबाई मंदिर परिसरात यंदा ‘एआय’ वॉच

Ambabai Mandir : श्री अंबाबाई मंदिर परिसरात यंदा ‘एआय’ वॉच

by प्रतिनिधी
0 comments

कोल्हापूर; प्रतिनिधी : श्री अंबाबाई मंदिर परिसरात नवरात्र उत्सवकाळात भाविकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. पाचही मुख्य प्रवेशद्वाराजवळ तब्बल १२० कॅमेरे, ५ डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर, हॅण्ड हेल्थ मेटल डिटेक्टर, १० बिनतारी यंत्रणा कार्यरत केली आहे. शिवाय प्रायोगिक तत्त्वावर यावर्षी आर्टिफिशल इंटेलिजन्स (एआय) कॅमेरे बसवण्यात आले आहेत. यामुळे गर्दीतून फेस कॅप्चर करता येणार आहे. चोरीच्या घटनांचा विचार करता ‘फिश आय’ कॅमेराही बसवला आहे.

मंदिर परिसरात टीव्ही आणि एलईडी स्क्रीन बसवण्यात आल्या आहेत. त्याद्वारे पालखी सोहळा आणि इतर कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात येणार आहे. एक्स-रे बॅगेज स्कॅनर अशा यंत्रणाही देवस्थान समितीने कार्यान्वित केल्या आहेत.

अंबाबाई मंदिरात प्लास्टिक पिशव्यांना बंदी

नवरात्र काळात करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसरात प्लास्टिक पिशव्यांना बंदी असेल. उत्सवकाळात येणाऱ्या भाविकांना कापडी पिशव्या उपलब्ध करून द्याव्यात. परिसरातील दुकानदारांनी याचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, देवस्थान समिती कर्मचारी आणि सुरक्षारक्षकांना गणवेश व ओळखपत्र सक्तीचे करण्यात आले आहे.  (Ambabai Mandir)

नवरात्रोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर मंदिरातील दुकानदार, देवस्थान समिती कर्मचारी, सुरक्षारक्षकांची समितीने बैठक घेतली. त्यामध्ये या सूचना देण्यात आल्या. समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, सहायक सचिव शीतल इंगवले, मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे उपस्थित होते.

दुकानातील प्रसाद साहित्य भेसळमुक्त असेल याबाबत काटेकोर काळजी घ्यावी, दुकानातील कामगारांसाठी ओळखपत्रे द्यावीत. कामगारांच्या नावाची यादी देवस्थान समितीकडे जमा करावी. अग्निरोधक यंत्रणा सुसज्ज ठेवा, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.

दरम्यान, मंदिरातील स्वच्छता व इतर कामे अंतिम टप्प्यात आहेत. गरुड मंडपाची प्रतिकृती उभारणी वेगाने सुरू आहे. घाटी दरवाजा, दक्षिण दरवाजा, जुना राजवाडा पोलिस ठाण्याकडील दर्शन मंडपाचे काम पूर्ण झाले आहे. दर्शनरांगेत भाविकांसाठी लाईव्ह दर्शनाची सोय उपलब्ध असेल. परिसरात आपत्कालीन कक्ष, वैद्यकीय मदत आणि माहिती कक्षही भाविकांच्या सेवेत असणार आहे. (Ambabai Mandir)

हेही  वाचा :

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00