About Us

एकेकाळी प्रसारमाध्यमे विरोधी पक्षांचे काम करीत होती. परंतु भारतातील मध्यवर्ती प्रवाहातील प्रसारमाध्यमे गेल्या दहा वर्षांत वेगाने सत्ताशरण होत आहेत. माध्यमांनी सत्तेला प्रश्न विचारणेच बंद केले आहे. पत्रकारिता प्रचारकी बनली आहे. माणसांच्या जगण्या-मरण्याशी संबंधित अनेक विषय माध्यमांच्या परिघात येत नाहीत. रोजच्या राजकीय, सामाजिक घटना-घडामोडी चक्रावून टाकताहेत आणि त्याचे नीट विश्लेषण होत नाही किंवा पक्षपातीपणे विश्लेषण केले जाते. अशा काळात मराठी भाषेतील स्वतंत्र विचारांचे माध्यम म्हणून महाराष्ट्र दिनमान (maharashtradinman.com) भूमिका बजावेल. ज्या घटकांना आवाज नाही त्यांचा आवाज बनण्याचा प्रयत्न करेल. कुणाचीही भीडभाड ठेवणार नाही आणि कुणावर अन्यायही करणार नाही. बदलत्या काळाची गरज म्हणून हे नवे माध्यम उभे राहिले आहे. मध्यवर्ती प्रवाहातील माध्यमांची बातमी जिथे थांबेल, तिथून पुढे महाराष्ट्र दिनमानची पत्रकारिता सुरू होईल.

संपादकः विजय चोरमारे

……

Maharashtra Dinman is an independent online media platform dedicated to news and opinion in Marathi Language. Maharashtra Dinman is owned and managed by Vijigisha Media Private Limited registered under the Indian Companies Act 2013. The registered office of the company is situated at 1132 D, Shukrawar Peth, Kolhapur 416002 (Maharashtra).

Editor: Vijay Chormare