Abhangwani : ‘तुकोबांची अभंगवाणी’चे प्रकाशन

sadhna shiledar music

कोल्हापूर : प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठाच्या ६१ व्या दीक्षान्त समारंभाच्या पूर्वसंध्येला आयोजित कार्यक्रमात शास्त्रीय गायिका डॉ. साधना शिलेदार यांच्या मधूर अभंग गायनाने कोल्हापूरकर रसिक मंत्रमुग्ध झाले. (Abhangwani)

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या आजवर संगीतबद्ध न झालेले निवडक अभंग शिवाजी विद्यापीठाच्या संत तुकाराम अध्यासनाने संगीतबद्ध केले. साधना शिलेदार यांनी गायलेल्या ‘तुकोबांची अभंगवाणी’ या सीडी स्वरुपातील चित्रफीत-ध्वनीमुद्रिकेचे प्रकाशन कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते करण्यात आले.

डॉ. शिलेदार यांनी यावेळी काही अभंगरचनांचे सादरीकरण केले. संत तुकाराम यांच्या अभंगांना त्यांनी किती ताकदीने स्वरसाज चढविला आहे, याची प्रचिती रसिकांना आली. डॉ. शिलेदार यांनी हे अभंग वेगवेगळ्या रागांमध्ये बांधले आहेत. या अभंगांमध्ये जोडोनिया कर, उभा राहिला समोर (राग- रागेश्री, अहिर भैरव, ललत), देवा आता ऐसा करी उपकार (झिंझोटी), अगा ये उदारा (बिहाग), आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने (जोग), उदंड देखिले (श्यामकल्याण, नंद, शंकरा), रंगी रंगे नारायण (बिंद्रावती सारंग), हरी तुझे नाम गाईन अखंड (किरवाणी), बोलावा विठ्ठल (विभास, तोडी) आणि आपुल्या माहेरा जाईन मी आता (भैरवी) यांचा समावेश आहे.(Abhangwani)

सांगोल्याचे ह.भ.प. ज्ञानेश्वर बंडगर यांनी प्रत्येक अभंगरचनेविषयी अत्यंत समर्पक निवेदन केले. डॉ. शिलेदार यांना निखिल मडवी (तबला), केदार गुळवणी (व्हायोलिन), डॉ. सचिन जगताप (बासरी), ऋषीकेश देशमाने (पखवाज), स्वरुप दिवाण (हार्मोनियम), हरिष केळकर (साइड ऱ्हिदम आणि टाळ) यांन साथसंगत केली. तंबोरा आणि कोरससाठी संगीत व नाट्यशास्त्र विभागाच्या अन्वी वालावलकर, अभय हावळ, कौस्तुभ शिंदे आणि संपदा गावस या कलाकारांनी साथ केली.(Abhangwani)

अध्यासनाचे समन्वयक डॉ. नंदकुमार मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. विनोद ठाकूरदेसाई यांनी आभार मानले.

लॉकडाऊनमधील आनंददायी काम

लॉकडाऊन काळात डॉ. साधना शिलेदार यांनी आपल्या नागपूर येथील घरी ‘तुकोबांच्या अभंगवाणी’ला चाली लावण्याचे काम केले. त्या काळात मला आनंद देणारे असे काम होते, अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. तेव्हा हार्मोनियम आणि तबला अशा दोन साथीदारांच्या जोडीने रेकॉर्डिंग केले होते. मात्र, शिवाजी विद्यापीठामध्ये इतक्या दर्जेदार साथीदारांसमवेत तुकारामांचे अभंग सादर करताना होणारा आनंद अवर्णनीय आहे, असे उद्गार त्यांनी काढले. कुलगुरू डॉ. शिर्के यांनी, डॉ. शिलेदार यांनी शिवाजी विद्यापीठाच्या उपक्रमासाठी दिलेला वेळ आणि घेतलेली मेहनत यासाठी धन्यवाद दिले. त्यांच्या योगदानामुळे एक अभिनव उपक्रम लोकांसमोर येत आहे, याचा आनंद वाटतो, असेही ते म्हणाले.(Abhangwani)

हेही वाचा :
आठवा वेतन आयोग २०२६ पासून?

Related posts

Literary Fest :‘दमसा’च्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

Saif stabbed : कोटीच्या खंडणीसाठी हल्ला

Mumbai Unsafe : सलमान, सिद्दीकी आणि सैफ