Home » Blog » फ्रेंडशिप फाईल’… हा लोकशाहीवरचा बलात्कारच : राज ठाकरे 

फ्रेंडशिप फाईल’… हा लोकशाहीवरचा बलात्कारच : राज ठाकरे 

by प्रतिनिधी
0 comments
Raj Thackeray criticizes the 500-crore audio clip

जमीर काझी :  मुंबई : मराठा आरक्षण संघटक  मनोज जरांगे -पाटील यांनी व्हायरल केलेल्या ऑडिओ क्लिपवरून महाराष्ट्रात खळबळ उडाली असताना त्यामध्ये आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही उडी घेतली आहे. भाजपच्या नेत्यांच्या ५०० कोटींच्या कथित डीलबद्दल व माध्यम दडपशाहीवरील चर्चेवर सडकून टीका करताना हा ‘लोकशाहीवरचा बलात्कार’ असल्याचा घणाघात केला आहे. (Raj Thackeray criticizes the 500-crore audio clip)

दिवाळीपूर्वीच राज्यात राजकीय बॉम्ब जरांगे- पाटील यांच्या ऑडिओ क्लिप फोडला आहे. त्यामुळे सत्ताधारी महायुतीतील भाजपा व शिवसेना शिंदे गट यांच्यातच जुंपलेली असून त्यांच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहे. अडीच वर्षांपूर्वीच्या या ऑडिओ क्लिपची मुख्यमंत्र्यांनी फॉरेन्सिक तपासणीचा निर्णय जाहीर केला आहे. त्याबाबत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करीत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, ही ‘वेळ मारून नेण्याचा प्रयत्न’ असून ऑडिओ, व्हिडिओ क्लिप, खून आणि बलात्काराची प्रकरणं फॉरेन्सिकडे दिली जातात. हे प्रकरणही फॉरेन्सिककडे दिलं, ते बरोबर आहे. कारण हा लोकशाहीवरचा बलात्कारच आहे, सध्या महाराष्ट्रात एक ‘फ्रेंडशिप फाईल’ ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. तुम्ही सगळ्यांनी ऐकली असेल. भारतीय जनता पक्षाचे काही पदाधिकारी, या पक्षाच्या सोशल मीडियात महत्वाची भूमिका बजावणारे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक ज्येष्ठ पदाधिकारी आणि स्वतःला निष्पक्ष राजकीय विश्लेषक म्हणवणारे पण खरंतर भारतीय जनता पक्षाच्या चिखलफेक सैन्याचं चिलखत घालून फिरणारे काही युट्युब प्रभावक यांच्यातल्या मैत्रीची ’फ्रेंडशिप फाईल’ आहे.ऑडिओ क्लिप. यांत कोणी कोणाला ५०० कोटी दिले इथपासून ते थेट माध्यमांना आम्ही कशी जरब दाखवू शकतो, ते एखादा भावनिक मुद्दा सरकारच्या अंगाशी आला तर लगेच त्या मुद्द्यापासून लोकांचं लक्ष कसे भरकटवायचे ?,यासाठी नवीन धार्मिक ध्रुवीकरणाचा मुद्दा कसा रेटला पाहिजे यासाठी काय केलं पाहिजे याचीही चर्चा करताना ऐकायला येत आहे. (Raj Thackeray criticizes the 500-crore audio clip)

मुख्यमंत्री वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न करतायेत

५०० कोटींचा मुद्दा गाजतोय. त्यावर खुलासे येतील आणि यायलाच पाहिजेत. पण भारतीय जनता पक्ष काय पद्धतीने समाज माध्यमं, माध्यमं यांच्यावर दडपशाही आणत आहे यावर पण चर्चा व्हायला हवी. मुख्यमंत्र्यांनी मी ऑडिओ क्लिपचा फॉरेन्सिक रिपोर्ट मागवला आहे असं म्हणून वेळ मारून न्यायचा प्रयत्न केला आहे. फॉरेन्सिक अहवाल हा ऑडिओ किंवा व्हिडिओची तथ्यता याबरोबर खून, बलात्कार, आर्थिक घोटाळे यांच्यासारख्या गंभीर गुन्ह्यात पुराव्यांची तथ्यता तपासण्यासाठी मागवला जातो. खरेतर यातले संभाषण ऐकलं तर समजतंच आहे की हा लोकशाहीचा खून आणि बलात्कारच आहे ! म्हणजे जे बोललं आहे ते गंभीर आहे आणि त्याची तपासणी व्हायला पाहिजे हे मुख्यमंत्र्यांना मान्य आहे हे बरं झाले , असा टोला राज ठाकरे यांनी लगावला आहे.

अडीच वर्षापूर्वीची क्लिप बाहेर आणली कुणी?

मुख्यमंत्री म्हणाले की ही क्लिप बहुदा दोन, अडीच वर्षांपूर्वीची असावी, ती आत्ताच का आली? खरतर ही क्लिप बाहेर आली कशी आणि ती आणली कोणी हा पण महत्वाचा प्रश्न आहे. याच्यात सरकार मधले नेहमीप्रमाणे ‘शह काट’शाहाचं’ राजकारण दिसते आणि हो फॉरेन्सिक अहवाल, त्यातील तांत्रिकता याच्यात महाराष्ट्राला गोल गोल घुमवू नका. महाराष्ट्राला जे कळायचं आहे ते कळलं आहे. ते तुम्हाला मान्य आहे आणि मुख्यमंत्री म्हणून तुम्ही किती निष्पक्ष आहात आणि तुम्ही कारवाई केली आहेत हे महाराष्ट्राला दाखवून द्या. तरच या फॉरेन्सिकला अर्थ आहे, अन्यथा तुमच्या फायद्यासाठी वाकवलेला फॉरेन्सिक ठरेल, असा हल्ला त्यांनी चढवला आहे.

रामदास कदम – दरेकरात जुंपली

५०० कोटीच्या ऑडिओ क्लिप मुळे माहितीतील भाजपा व शिवसेना शिंदे गट या पमुख पक्षांमध्ये आरोप -प्रत्यारोप होत आहेत. एकनाथ शिंदे यांना संपवण्याचा विडा भाजपाच्या नेत्यांनी घेतला आहे असा आरोप माजी मंत्री रामदास कदम यांनी केला आहे. त्याबाबत भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांचे जरांगे सोबतचे  जेवण करीत असल्याचे फोटो दाखवून हे आरोप केले. तर जेव्हा फडणवीस यांच्यावर जरांगेकडून टीका होत असताना त्यामागे पाठीमागे कोण आहे?, हे ही बाहेर काढायला हवे, असे प्रत्युत्तर भाजपाचे आ. प्रविण दरेकर यांनी दिले आहे.

कदम म्हणाले,’ भाजपाकडून एकनाथ शिंदे यांचा केसाने गळा कापण्याचा प्रयत्न होत आहे का?, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या घात करत आहेत. सुपार्‍या घेत आहेत. मराठा समाजाच्या नेत्यावर उठत आहेत, असा आरोप त्यांनी केला. त्यावर जरांगे पाटील यांनी कदम हाच एकनाथ शिंदे साठी सर्वात अडचणीचा ठरणार असल्याचा टोला आणला. (Raj Thackeray criticizes the 500-crore audio clip)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!