नवी दिल्ली : नवी दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने पहिल्या दिवशी २ बाद ३१८ धावा केल्या. सलामीवीर यशस्वी जयस्वालने शानदार शतक झळकावत नाबाद १७३ धावांवर खेळत आहे. जयस्वालचे कारकीर्दीतील हे सातवे शतक आहे. त्याने कसोटीत पहिले शतक वेस्ट इंडिज संघाबरोबर झळकावले होते. (Jaiswal’s seventh century)
दुसऱ्या कसोटीतील पहिल्या दिवशी भारताची सलामीवर जोडी के.एल. राहूल आणि यशस्वी जयस्वाल मैदानावर उतरली. दोघांनी पहिल्या गड्यासाठी ६७ धावांची भागीदारी केली. वॉरिकनच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक टेविन इमलाचने त्याला यष्टीचीत केले. त्याने वेगवान खेळी करत ३८ धावा केल्या. त्यानंतर आलेला साई सुदर्शन आणि जयस्वालची जोडी जमली. डावखुऱ्या पियरने चांगली गोलंदाजी केली. पण जयस्वाले त्यालाही सोडले नाही. षटकार, चौकात मारत त्याने धावफलक हालता ठेवला. (Jaiswal’s seventh century)
लंचनंतर पहिल्याच षटकात जेडेन सील्सविरुद्ध तीन चौकार मारत जयस्वालने अर्धशतक झळकावले. साई सुदर्शनने पियरेला सीमापार धाडत अर्धशतक साजरे केले. सुदर्शन ५८ धावांवर खेळत असताना जोमेल वॉरिकनने त्याचा झेल सोडला. पण त्याचा त्याला फायदा उठवत आला नाही. पियरेने त्याला पायचीत पकडले. जयस्वालने साई सुदर्शनबरोबर दुसऱ्या गड्यासाठी १९३ धावांची भागीदारी केली. (Jaiswal’s seventh century)
त्यानंतर यशस्वी जयस्वालने कसोटी कारकीर्दीतील सातवे शतक साजरे केले. २३ वर्षीय जयस्वालने २६ व्या सामन्यात ही कामगिरी केली आहे. जयस्वालने कसोटी कारकीर्दीची सुरुवात २०२३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध केली होती. त्याने त्यावेळी १७१ धावांची खेळी केली होती.
आज दिवसभराचा खेळ थांबला तेव्हा भारताने २ बाद ३१८ धावा केल्या. जयस्वाल १७३ धावांवर तर कर्णधार शुभमन गिल २० धावांवर खेळत आहेत. (Jaiswal’s seventh century)