Home » Blog » न्यूझीलंडच्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत भारताचा विजय  

न्यूझीलंडच्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत भारताचा विजय  

by प्रतिनिधी
0 comments
India secures victory while chasing a big total set by New Zealand

कोल्हापूर : प्रतिनिधी : न्यूझीलंड दौऱ्याची भारताने झकास सुरूवात केली. न्यूझीलंडच्या बलाढ्य २२६ धावांचा पाठलाग करत चार गड्यांनी भारताने सामना जिंकला. कर्णधार श्रेयस अय्यर, नमन धीर, अक्षय पटेल आणि संजू सॅमसन यांनी फटकेबाजी करत भारताच्या विजय सुकर केला. टी-२० सामन्यात भारताने आत्तापर्यंतचा सर्वात मोठी धावसंख्या पार केली आहे. (India secures victory while chasing a big total set by New Zealand)

यजमान न्युझीलंडने २० षटकात ४ बाद २२५ धावांचा डोंगर उभारला. त्यांच्या ग्लेन फिलिप्सने ४० चेंडूत ८ चौकार, ३ षटकांच्या मदतीने ८२ धावांची नाबाद तडाखेबाज खेळी केली. सलामीवीर फिन अलनने २४ चेंडूत ४५ तर डॅरिल मिचेलने १९ चेंडूत २८ धावा केल्या. शेवटच्या षटकात जेकब्सने अवघ्या १६ चेंडूत ३ षटकार खेचत ३१ धावांची स्फोटक खेळी केली. मयांक यादव, अर्शदीप सिंग, अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक गडी बाद केले. (India secures victory while chasing a big total set by New Zealand)

न्यूझीलंडच्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना संजू सॅमसनने धडाकेबाज खेळीचा प्रत्यय दिला. त्याने ३३ चेंडूत ८ चौकार आणि ४ षटकारांच्या सहाय्याने ६७ धावांची खेळी करत भारताला चांगली सुरुवात केली. अभिषेक शर्माने १२ चेंडूत २९ धावा केल्या. श्रेयस अय्यरने २८ चेंडूत ४२, अक्षय पटेलने १४ चेंडूत २४ धावा केल्या. शेवटच्या षटकात भारताला विजयासाठी आठ धावांची गरज होती. नमन धीरने चौकार आणि षटकार ठोकत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. नमन धीरने १५ चेंडूत ५ चौकार, दोन षटकारांच्या सहाय्याने नाबाद ४२ धावा केल्या. (India secures victory while chasing a big total set by New Zealand)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!