Home » Blog » MP Shahu Chhatrapati : मराठा आरक्षणप्रश्नी पंतप्रधान मोदींचे मार्गदर्शन घ्यावे : शाहू छत्रपती

MP Shahu Chhatrapati : मराठा आरक्षणप्रश्नी पंतप्रधान मोदींचे मार्गदर्शन घ्यावे : शाहू छत्रपती

by प्रतिनिधी
0 comments
MP Shahu Chhatrapati

कोल्हापूर : प्रतिनिधी : मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेत असताना राज्यातील महाविकास आघाडीसह सर्व पक्षांच्या नेत्यांच्या विश्वासात घ्यावे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन घ्यावे अशी मागणी काँग्रेसचे खासदार शाहू छत्रपती यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे. मराठा समाजाला आरक्षण देता असताना घटनादुरुस्ती करावी लागली तर पंतप्रधान मोदींना तशी विनंती करावी असे त्यांनी म्हटले आहे. (MP Shahu Chhatrapati)

पत्रकात खासदार  शाहू छत्रपती यांनी असे म्हटले आहे की, मनोज जरांगे यांनी मुंबईत मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे. यावेळची लढाई आरपारची आहे. कोणत्याही आश्वासनावर विश्वास ठेऊन आंदोलन मागे घेण्याच्या मनस्थितीत मराठा समाज दिसत नाही. मराठा समाजाची मानसिकत आणि मनोज जरांगे पाटील यांचा निर्धार पाहता या आंदोलनाची नोंद गांभीर्याने घेण्याची जबाबदारी आता महाराष्ट्र शासनावर आहे. (MP Shahu Chhatrapati)

महाराष्ट्रात मराठा समाजाचे ५८ मोर्चे निघाले त्यावेळी आम्ही एक पर्याय सुचवला होता, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आरक्षणाची ५० टक्के ची मर्यादा वाढवावी आणि त्यासाठी घटनेमध्ये दुरुस्ती करावी ज्यामुळे संपूर्ण देशभरातील मराठा समाजाला आरक्षण मिळू शकेल. म्हणून केंद्र सरकारने हा प्रश्न सोडवावा अशी आमची भूमिका आहे. आम्ही या पर्यायावर आजही ठाम आहोत.

मराठा समाज निवडणूक काळात आपल्यापासून दूर जाईल अशी भीती असलेल्या सरकारने सातत्याने मराठा समाजाला कायद्याच्या निकषावर टिकणारे आरक्षण देऊ अशी जाहीर वक्तव्य प्रचार सभेतून केली आहेत. गेले अनेक वर्षे हीच आश्वासने सातत्याने दिली जात आहेत. राज्यातील जनतेने महायुतीला सत्ता दिली. आता मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी या सरकारची आहे. ही जबाबदारी आता टाळता येणार नाही. नोकरी आणि शैक्षणिक क्षेत्रातील आरक्षण दिल्याशिवाय मराठा समाज सुद्धा थांबणार नाही. सरकारला आरक्षण द्यावेच लागेल, मराठा समाजाला वारंवार आश्वासन दिले आहे त्यामुळे सरकारने या आश्वासनाची पूर्तता करण्याची वेळ आली आहे. (MP Shahu Chhatrapati)

सरकारने आता ठोस निर्णय घेण्याची वेळ आली असताना महायुतीचे नेते या विषयाला बगल देण्याचे प्रयत्न करत असल्याचे समोर येत आहे. आता सरकारच्या भूमिकेकडे मराठा समाजाचे लक्ष लागले आहे. सरकारने निर्णय घ्यावा आणि मराठा समाजाला न्याय द्यावा. या आंदोलनाला वेगळे वळण देऊन प्रश्न प्रलंबित ठेवण्याचा नेहमीचा प्रयत्न सरकारने करु नये कारण मराठा समाजाची सहनशीलता संपली आहे. जर सरकार पुन्हा जबाबदारी टाळू लागले तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील याची जाणीव सरकारने ठेवावी.

मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेत असताना राज्यातील महाविकास आघाडीसह सर्व पक्षांच्या नेत्यांना विश्वासात घ्यावे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन घ्यावे. मराठा समाजाला आरक्षण देत असताना घटनादुरुस्ती करावी लागली तर तशी विनंती त्यांना करावी, असे पत्रकात खासदार शाहू छत्रपतींनी म्हटले आहे. (MP Shahu Chhatrapati)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00