मुंबई : प्रतिनिधी : भाजप ही पोरं पळवणारी टोळी असून सत्तेच्या भुकेपोटी इतर पक्ष फोडत आहेत. भाजपच्या फोडीफोडीच्या राजकारणापासून वाचवण्यासाठी, सत्तेतून खाली खेचण्याठी देशातील जनतेला ऑपरेशन कमळ करावे लागेल, असे आवाहन शिवसेना पक्ष प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. ते शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिन सोहळ्यात बोलत होते. विरोधकांकडून माझ्यावर होणारे आरोप खरे वाटत असतील तर शिवसेना पक्षप्रमुखपद तात्काळ सोडायला तयार आहे. मला पदाची हाव नाही. माझ्या जागी सामन्य शिवसैनिकाला त्या पदावर बसवा असे भावनिक उद्गार काढले. (Thackeray criticizes ‘Operation Tiger’)
शिवसेनेचे सहा खासदार फुटल्याने उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले होते. सहा खासदारांनी पक्षाची साथ सोडल्याबद्दल त्यांनी मतदारांची माफी मागितली. ज्यांच्या मतांवर निवडून आला त्याचा विश्वासघात केला, असा आरोप करत त्यांना जाब विचारणार की नाही? असा सवालही त्यांनी विचारला. (Thackeray calls for ‘Operation Lotus’)
भाजपकडून हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न
उद्धव ठाकरे म्हणाले, फोडाफोडीच्या राजकारणांमुळे जनतेचा लोकशाहीवरील विश्वास उडत चालला आहे. निवडणुकीचा फार्स सुरू असून कुणाचेही बटण दाबले तर मते भाजपकडे जाते. निवडून आलेले नंतर फुटुन भाजपमध्ये जात असतील तर निवडणुकीचा फार्स कशासाठी असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ‘वन नेशन, वन इलेक्शन’ ही भाजपची केवळ नावापुरती घोषणा असून देशात विरोधी पक्ष असून नयेत असे त्यांना वाटते. ‘वन नेशन नो इलेक्शन’ अशी हुकुमशाही आणण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला.
संसदेत भाजपकडे दोन तृतियांश बहुमत नाही. भाजपचे जे खासदार निवडून आले आहेत त्यातील दोन तृतीयांश भाजपचे नसून काँग्रेस व इतर पक्षातील आले आहेत. पक्षांची चोरी लपवण्यासाठी त्याला ऑपरेशन असे गोंडस नाव दिल्याची टीका ठाकरेंनी केली. (Thackeray criticizes ‘Operation Tiger’)
नेते उपकार विसरुन शिवसेना संपवायला निघालेत
शिवसेना काँग्रेसमध्ये विलिन करणार या टीकेचाही ठाकरेंनी चांगलाच समाचार घेतला. शिवसेना ३० वर्षे भाजपसोबत राहून भाजमध्ये विलीन झाली नाही. मग काँग्रेस पक्षात कशी विलीन होइल असा सवाल केला. भूतकाळात शिवसेनेने काँग्रेसशी टोकाचे वैर पत्करले. भाजपच्या वाट्याचे वार शिवसेनेने स्वत:वर झेलले. काँग्रेसने शिवसेनेची माणसे यापूर्वी फोडली पण् त्यांना कधी मुख्यमंत्री केले नाही. आता भाजप शिवसेनेला मुळासकट उखडून टाकायचा प्रयत्न करत आहे. मातोश्रीला बदनाम करत आहे. भाजपच्या ज्या नेत्यांना एकेकाळी तडीपारीचा सामना करावा लागला त्यांना बाळासाहेबांनी आपला माणून म्हणून आश्रय दिला आणि वाचवले. आज तेच नेते उपकार विसरुन शिवसेना संपवायला निघाले आहेत अशी टीका ठाकरेंनी केली.
केंद्र सरकारवरही ठाकरे यांनी टीका केली. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना पराभूत करण्यासाठी अडीच लाख लष्कर बंगालमध्ये आणले होते. जर अडीच लाखांची फौज तुम्ही तुमच्या पक्षासाठी वापरत असाल तर माणिपूर, पाकव्याप्त काश्मीरमध्ये का वापरत नाही असा सवाल त्यांनी केला. (Thackeray criticizes ‘Operation Tiger’)