Home » Blog » बारामतीत सुनेत्रा पवार आणि राहूरीत अक्षय कार्डिले विक्रमी मतांनी विजयी  

बारामतीत सुनेत्रा पवार आणि राहूरीत अक्षय कार्डिले विक्रमी मतांनी विजयी  

0 comments
Sunetra Pawar and Akshay Cardile Emerge Victorious

पुणे : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दोन लाख १४ हजार ९३ मतांनी विजय मिळवला. त्यांना २ लाख १८ हजार ४८३७ मते मिळाली. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पोटनिवडणूक घेण्यात आली. राहूरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे अक्षय कार्डिले विक्रमी एक लाख १२ हजार ५८७ मतांनी विजयी झाले. (Sunetra Pawar and Akshay Cardile Emerge Victorious)

बारामतीत स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २०१९ मध्ये केलेला मताधिक्याचा विक्रम सुनेत्रा पवार यांनी मोडला. अजित पवार यांनी त्यावेळी भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांचा एक लाख ६५ हजार २६५ मतांनी पराभव केला होता. हा विक्रम सुनेत्रा पवार यांनी मोडला. सुनेत्रा पवारांनी दोन लाख १४ हजार ९३ मताधिक्क्याने विजय संपादन केला. बारामतीची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करण्यात आले. महाविकास आघाडीने या निवडणूकीतून माघार घेतली. पण २२ उमेदवार रिंगणात होते. या २२ उमेदवार आणि नोटा यांना ४८३७ मते मिळाली. (Sunetra Pawar and Akshay Cardile Emerge Victorious)

राहूल कार्डिले यांचा मोठा विजय… आमदार शिवाजी कार्डिले यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपच्या अक्षय कार्डिले यांनी एक लाख १२ हजार ५८७ मतांनी विजय मिळवला. अक्षय कार्डिले यांना एक लाख ४० हजार ९३ मते मिळाले. त्यांच्या विरोधातील प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादी शरद पवार गटाचे गोविंद मकोटे यांना २७ हजार ५०६ मते मिळाली. अन्य सहा उमेदवारांच्या अनामत रक्कमा जप्त झाल्या. कार्डिले यांच्या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. (Sunetra Pawar and Akshay Cardile Emerge Victorious)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00