Home » Blog » राम मंदिर दानपेटी चोरीतील रक्कमेचा वापर आमदार-खासदार फोडाफोडीसाठी

राम मंदिर दानपेटी चोरीतील रक्कमेचा वापर आमदार-खासदार फोडाफोडीसाठी

by प्रतिनिधी
0 comments
Sanjay Raut's allegation regarding donation box

मुंबई : प्रतिनिधी : राम मंदिराच्या दानपेटीतून चोरी झालेला पैसा हा निवडणुकीसाठी, आमदार-खासदार फोडण्यासाठी वापरला आहे, असा खळबळजनक आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला.

अयोध्यात नवीन बांधण्यात आलेल्या श्रीराम मंदिरातील दानपेटीतील चोरीचे प्रकरण उघडकीस आल्यावर देशभर मोठा गदारोळ उडाला आहे. दानपेटीतील रक्कमेची चोरीचा प्रकार घडलाच नाही असा दावा श्रीराम मंदिर ट्रस्टने पहिल्यांदा  केला होता. त्यानंतर मंदिराला मिळालेल्या कोट्यवधी रुपयांच्या देणग्यामध्येही गैरव्यवहार झाल्याचा आरोपावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उत्तर प्रदेश सरकारने या प्रकरणी एसआयटी नेमली असून आत्तापर्यंत आठ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. काही जणांना अटक झाली असून पोलिस त्यांच्याकडे चौकशी करत आहेत. गैरव्यवहाराच्या आरोपावरुन श्रीराम मंदिर ट्रस्टच्या काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. (Sanjay Raut’s allegation regarding donation box)

दोन हजार कोटींचा अपहार?

राम मंदिराला भाविकांनी दिलेल्या देणगींच्या रक्कमेत दोन हजार कोटी रुपयांच्यापेक्षा जास्त अपहार झाला आहे, असा आरोप राऊत यांनी केला. हे पैसे कुठे गेले असा सवाल करत या पैशाचा वापर खासदार फोडण्यासाठी झाला आहे. त्यामध्ये शिंदे गटाच्या सहा खासदारांनाही फोडण्यासाठी जी रक्कम वापरली ती दान पेटीतील आहेत का? याचा तपास करावा लागेल असे ते म्हणाले. (Sanjay Raut’s allegation regarding donation box)

चांदीच्या विटेची पावतीच दिली नाही

श्रीराम मंदिर ट्रस्ट स्थापन झाला तेव्हा शिवसेनेने एक कोटी रुपयांचा चेक दिला होता. तसेच २५ किलो वजनाची पहिली चांदीची वीटही शिवसेनेकडून देण्यात आले. याची कोणतीही पावती आम्हाला दिलेली नाही. त्या ठिकाणी सर्वात जास्त चोऱ्या चांदीच्या विटा आणि चांदीच्या दागिन्यांच्या झाल्या आहेत असा खळबळजनक दावाही त्यांनी केला. (Sanjay Raut’s allegation regarding donation box)

You may also like

error: Content is protected !!