मुंबई : प्रतिनिधी : मतदार यादीतील अनियमिततेबाबत चौकशी करण्याचे आदेश राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. येत्या आठ ते दहा दिवसात त्याबाबतचा अहवाल राज्यातील सर्व जिल्ह्यातून निवडणूक आयोगाकडे अहवाल सादर केला जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. महाविकास आघाडीसह मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मतदार यादीतील असंख्य त्रुटी व कार्यपद्धतीवर घेतलेल्या तीव्र आक्षेपामुळे निवडणूक आयोग आता अलर्ट मोडवर आले आहे. (Chokkalingam’s orders)
महाविकास आघाडी, मनसेकडून घोळ निदर्शनास
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटकातील मतदार यादीतील त्रुटींवर उघड करीत ‘वोट चोरी ‘ चा मुद्दा देशभरात पेटविला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडीचे नेते शरद पवार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, विजय वड्डेटीवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, जयंत पाटील, शेकापचे जयंत पाटील आणि मनसे प्रमुख राज ठाकरे आदींनी सलग दोन दिवस राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम आणि निवडणूक आयोगाचे अध्यक्ष दिनेश वाघमारे यांची भेट घेऊन निवडणूक यादीतील घोळ पुराव्यासह निदर्शनास आणल्या. जोपर्यंत मतदार यादीतील त्रुटी व कामाकाजातील घोळ दूर होत नाही, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न घेण्याची मागणी केली होती. (Chokkalingam’s orders)
अहवाल विरोधी पक्षाला देणार
महाविकास आघाडी शिष्टमंडळ भेटून गेल्यानंतर निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांनी दिलेल्या पुराव्याची दखल घेऊन मुख्य निवडणूक आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना मतदार यादीतील त्रुटींची चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. यामध्ये एकाच मतदारसंघात एकाच व्यक्तीचे नाव दोन ठिकाणी नोंदले गेले आहे का, याची तपासणी होईल. दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. दिवाळीमुळे हा अहवाल पुढील आठवड्यात सादर होण्याची शक्यता आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर तो विरोधी पक्षाच्या नेत्यांना उपलब्ध करून दिला जाणार आहे. (Chokkalingam’s orders)
विरोधकांच्या शिष्टमंडळाने नोंदवलेले आक्षेप:
मतदार यादीतील नावे वगळण्याचा तपशील का दिला नाही?, २०२४ च्या निवडणुकांदरम्यान मोठ्या प्रमाणात नवीन मतदारांची नोंदणी झाली, तर काही नावे मतदार यादीतून वगळली गेली. मात्र, ही नावे का वगळली गेली, याची कारणे आणि तपशील राजकीय पक्षांना किंवा मतदारांना उपलब्ध का करून दिले नाहीत? नवीन मतदार यादी का लपवली?, मतदार यादीत ऑक्टोबर २०२४ ते जुलै २०२५ दरम्यान समाविष्ट झालेल्या नवीन नावांचा तपशील अद्याप प्रसिद्ध झालेला नाही. (Chokkalingam’s orders)
बिहारसाखरी विशेष मोहीम राबवा
मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक यांसारख्या शहरांमध्ये परराज्यातून आलेले अनेक मतदार आपली नोंदणी दोन ठिकाणी करतात, जे कायद्याने गुन्हा आहे. निवेदनात प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे की, निवडणूक आयोग दुबार नोंदणी रोखण्यासाठी काय उपाययोजना करत आहे? बिहारमध्ये यासाठी विशेष मोहीम राबवली गेली, मग महाराष्ट्रात असा प्रयत्न का होत नाही? डी-डुप्लिकेशन पद्धतीचा वापर करून दुबार नोंदणी काढण्याची मागणी करण्यात आली आहे. व्हीव्हीपॅटचा वापर का नाही?आदीबाबत शंका उपस्थित केल्या आहेत.
मागण्याची दखल घेऊन मुख्य निवडणूक आयुक्तांनी चौकशीच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.मात्र मुळात हा घोळ त्याच्याकडूनच झाला असताना ते त्यामध्ये काय चौकशी करतील?, त्यांचा अहवाल आल्यानंतर आम्ही पुढील भूमिका जाहीर करू,
: शशिकांत शिंदे ( प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट)