Home » Blog » Priyanka Chaturvedi : देशप्रेमाचे धडे मोदी सरकारने अफगाणिस्तानकडून घ्यावेत : प्रियांका चतुर्वेदी

Priyanka Chaturvedi : देशप्रेमाचे धडे मोदी सरकारने अफगाणिस्तानकडून घ्यावेत : प्रियांका चतुर्वेदी

by प्रतिनिधी
1 comment
Priyanka Chaturvedi

नवी दिल्ली : पाकिस्तानने अफगाणिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये अफगाणिस्तानचे तीन युवा क्रिकेटपटू ठार झाले. त्यानंतर अफगाणिस्ताने नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी- २० तिरंगी क्रिकेट मालिका रद्द करण्याचा निर्णय घेतला. यावरुन शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदींनी देशप्रेमाचे धडे अफगाणिस्तानकडून घ्यावेत असा टोला केंद्रातील मोदी सरकार आणि बीसीसीआयला लगावला आहे. (Priyanka Chaturvedi)

पहलगाम हल्ल्यात २६ पर्यटकांची हत्या केली होती. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानवर हल्ले घेऊन चांगलाच धडा शिकवला होता. त्यानंतर झालेल्या अशिया चषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानविरुद्ध सामने खेळू नयेत अशी मागणी शिवसेनेने केली होती. अनेक भारतीयांनी पाकिस्तानबरोबर सामने खेळू नये असे मत व्यक्त केले होते. पण केंद्र सरकारच्या परवानगीने भारतीय संघ पाकिस्तानबरोबर तीन सामने खेळला आणि भारताने पाकिस्तानला हरवत अशिया चषक पटकावला. (Priyanka Chaturvedi)

बीसीसीआय, केंद्र सरकारने देशाला पहिले प्राधान्य द्यावे

पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात अफगाणिस्तानमधील तीन क्रिकेटपटू ठार झाले. त्यामुळे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये तणाव आणखी वाढला आहे. या हल्ल्यानंतर अफगाणिस्तानने पाकिस्तानविरुद्ध होणारी टी-२० मालिका रद्द करण्याचा निर्णय घेतला. यावरुन खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी देशाला कसे प्राधान्य द्यायचे हे अफगाणिस्तानकडून शिका असा टोला लगावला आहे. खासदार प्रियांका चतुर्वेदीनी एक्सवर पोस्ट केली आहे, त्यात असे म्हटले आहे की,  पाकिस्तानची व्यवस्था काही भ्याड लोकांनी बनलेली आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानसोबतचे त्यांचे मालिका सामने रद्द केल्याचे पाहून आनंद झाला. कदाचित बीसीसीआय आणि भारत सरकार खेळांपेक्षा देशाला प्राधान्य कसे द्यायचे याबद्दल टिप्स घेऊ शकतील, या शब्दांत प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्वीट केले आहे. भारताचे २६ पर्यटक मारल्यानंतरही भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानशी खेळला होता. म्हणूनच बीसीसीआय आणि केंद्र सरकारने पहिले प्राधान्य देशाला द्यायला हवे. खेळापेक्षा देशाला प्राधान्य कसे द्यावे हा धडा अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाकडून घ्यायला हवा, असा सल्ला प्रियंका चतुर्वेदी यांनी दिला आहे. त्याचवेळी श्रीलंका संघानेही या मालिकेतून माघार घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. (Priyanka Chaturvedi)

पाक हवाई हल्ल्यात तीन क्रिकेटपटू ठार

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन्ही देशांमध्ये बुधवारी शस्त्रसंधीचा करार करण्यात आला होता. पण शुक्रवारी, पाकिस्तानने शस्त्रसंधीच्या कराराचे उल्लंघन करत अफगाणिस्तानवर हवाई हल्ला केला. पक्तिका प्रांतावर करण्यात आलेल्या या हवाई हल्ल्यामध्ये अफगाणिस्तानच्या स्थानिक क्लबचे तीन क्रिकेटपटू कबीर, सिबगतुल्लाह आणि हारून यांचा मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. याशिवाय आणखी पाच नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ही घटना तेव्हा घडली, जेव्हा हे खेळाडू प्रांतीय राजधानी शराना येथे स्थानिक स्पर्धा खेळून घरी जात होते. खेळाडूंचा मृत्यू झाल्यानंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यासोबत होणाऱ्या टी-२० तिरंगी मालिकेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

You may also like

1 comment

Satish October 19, 2025 - 8:05 am

कोण है ये प्रियांका चतुरवेदी

Comments are closed.

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00